शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani, Reliance Jio: 5G सोडा, मुकेश अंबानींची 6G ची तयारी! 100 नाही, 1000 जीबीपीएसचा स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:35 AM

1 / 8
देशात अद्याप सरकारी कंपनी बीएसएनएल फोरजी सेवा सुरु करू शकलेली नाही, अन्य कंपन्या ५जी ची तयारी करत आहेत. पुढील सहा महिन्यांत देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे, असे असताना मुकेश अंबानींनी एक पाऊल पुढे टाकले आहे. रिलायन्स जिओने 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे.
2 / 8
जिओची उपकंपनी Estonia ने 6G टेक्नोलॉजीवर संशोधन करण्यास सुरुवात केली आहे. Jio Estonia या प्रकल्पावर University of Oulu सोबत काम करत आहे.
3 / 8
कंपनीने या योजनेबाबत अधिक माहिती दिलेली नाही. कंपनी ओऊलू विद्यापीठासोबत मिळून 6G टेक्नोलॉजीच्या फ्यूचर वायरलेस end-to-end सोल्यूशनवर काम करत असल्याचे म्हटले आहे.
4 / 8
या सहकार्यातून एरिअल आणि स्पेस कम्युनिकेशन, होलोग्राफिक बीमफॉर्मिंग, सायबर सिक्युरिटी, मायक्रो इलेक्ट्रॉनिक आणि फोटोनिक्समध्ये 3D कनेक्टेड इंटेलिजेंसला इंडस्ट्री आणि शैक्षणिकमध्ये मदत मिळणार आहे. सोबतच जिओ आणि University of Oulu कंझ्युमर्स गुड्स, ऑटोमोटिव्ह आणि स्पेस गुड्समध्ये सिक्स जीची उत्पादने बनविण्याचा प्रयत्न करतील.
5 / 8
याशिवाय Jio 6G चा परिणाम मॅन्युफॅक्टरिंग, डिफेंस आणि इंडस्ट्रीअल मशीनरीवर होणार आहे. ६जी तंत्रज्ञान ५जी पेक्षा चांगली असेल. सेल फ्रा मीमो, इंटेलिजंस सर्फेस आणि वेगवान इंटरनेट आदीवर लक्ष केंद्रीत असेल. हे नेटवर्क ५जी सोबतच मिळेल मात्र मोठ्या कंपन्या, ग्राहकांना ही सेवा मिळेल.
6 / 8
6G च्या स्पीडबाबत सध्या कोणताही डेटा नाही, पण रिपोर्ट्सनुसार, त्याचा स्पीड 5G पेक्षा 100 पट जास्त असेल. सॅमसंगचा अंदाज आहे की त्याच्या पुढच्या पिढीच्या नेटवर्कचा वेग 1000Gbps असेल.
7 / 8
चीन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये त्याचे संशोधन आणि विकासाचे काम सुरू झाले आहे. ओप्पोचा विश्वास आहे की 6G नेटवर्क लोकांची एआयशी संवाद साधण्याची पद्धत बदलेल. तथापि, 2025 पूर्वी 6G नेटवर्क पाहायला मिळणार नाही.
8 / 8
चीन आणि जर्मनीसारख्या देशांमध्ये त्याचे संशोधन आणि विकासाचे काम सुरू झाले आहे. ओप्पोचा विश्वास आहे की 6G नेटवर्क लोकांची एआयशी संवाद साधण्याची पद्धत बदलेल. तथापि, 2025 पूर्वी 6G नेटवर्क पाहायला मिळणार नाही.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानी