शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio ला मोठा धक्का! केवळ महिनाभरात गमावले तब्बल १.९ कोटी युझर्स; ‘या’ कंपनीला मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:05 PM

1 / 9
टेलिकॉम क्षेत्रात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ याची एन्ट्री झाल्यापासून अन्य कंपन्यांचे धाबे दणाणल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे दिसत आहे. केवळ एका महिन्यात तब्बल १.९ कोटी युझर्सनी जिओला रामराम केल्याची आकडेवारी समोर येत आहे.
2 / 9
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आकडेवारी दिली आहे. रिलायन्स जिओने सप्टेंबर २०२१ महिन्यात १.९ कोटी कनेक्शन गमावले आहेत. तर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलने या दरम्यान २.७४ लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. तर Vi चेही १०.७७ लाख युझर्स कमी झाले आहेत.
3 / 9
या आकडेवारीच्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या सप्टेंबर पर्यंत ४२.४८ कोटी मोबाइल ग्राहक होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात त्यांनी १.९ कोटी कनेक्शन गमावले आहे. तर, एअरटेलच्या ग्राहकांची संख्या ३५.४४ कोटी झाली आहे.
4 / 9
ऑगस्टमध्ये एअरटेलच्या ग्राहकांची संख्या ३५.४१ कोटी होती. Vi कनेक्शन मध्ये १०.७७ लाख घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, रिलायन्स जिओने सप्टेंबरमध्ये तिमाहीत परिणामांची घोषणा करताना ग्राहकांच्या संख्येत घसरण होईल, असा अंदाज वर्तवला होता.
5 / 9
या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात एकूण वायरलेस कनेक्शनची संख्या कमी होवून ती ११६.६० कोटी वर पोहोचली आहे. ही आकडेवारी ऑगस्ट मध्ये ११८.६७ कोटीवर होती. तर, शाओमी इंडियाचे सब ब्रँड रेडमी इंडियाने आपल्या आगामी रेडमी नोट ११ ५ जी स्मार्टफोनच्या टेस्टिंगसाठी रिलायन्स जिओशी हातमिळवणी केली आहे.
6 / 9
दोन्ही कंपन्यांनी एकत्र चाचणी केली आहे. शाओमी इंडियाचे मुख्य सीओओ मुरलीकृष्णन बी यांनी म्हटले की, आम्ही भारतातील पहिली कंपनी आहोत. ज्याने २०१७ मध्ये रेडमी नोट ४ ला बाजारात उतरवून पहिला ४जी स्मार्टफोन लाँच केला होता.
7 / 9
दरम्यान, रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना २ जीबी डेटा देणारे अनेक प्लॅन्स ऑफर करतेय. निरनिराळी किंमत असलेल्या या प्लॅन्समध्ये २८ दिवसांपासून ३६५ दिवसांपर्यंतची वैधता देण्यात येते. रिलायन्स जिओच्या सर्वच प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देण्यात येते.
8 / 9
रिलायन्स जिओच्या ४४४ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. या या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची आहे. याचाच अर्थ यासोबत ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. यासोबतच ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभही मिळतो. या प्लॅनमध्ये JioTv आणि JioCinema सारख्या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
9 / 9
या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता मिळते. या प्रमाणे या प्लॅनसोबतदेखील ग्राहकांना ११२ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनसोबतही अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा, तसंच जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येतं. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ वर्षांसाठी Disney+ Hotstar चं सबस्क्रिप्शनदेखील मिळतं.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाMukesh Ambaniमुकेश अंबानी