Reliance Jio Offer: Jio's Family Plan! Run four mobiles in a single recharge; 5G will be free
Reliance Jio Offer: जिओचा धमाका प्लॅन! एकाच रिचार्जमध्ये चार मोबाईल चालवा; 5G तर फुकटच मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 10:30 AM1 / 7रिलायन्स जिओने ५जीमध्ये एअरटेलला खूप मागे टाकले आहे. अनेकांना तेराशे ते दीड हजार एमबीपीएसचा स्पीड मिळत आहे. आजकाल अनेकांच्या घरांत सर्वांचीच जिओची सिमकार्ड आहेत. यामुळे सर्वांना दर महिन्याला रिचार्ज मारणे खिशालाही परवडणारे नाहीय. यामुळे जिओने एकाच रिचार्जमध्ये चार जणांना मोबाईल वापरता येईल असा प्लॅन आणला आहे. 2 / 7रिलाय़न्स जिओची ५जी सेवा २३९ पेक्षा जास्तीचे रिचार्ज मारणाऱ्यांना अनलिमिटेड उपभोगता येत आहे. जिओ स्वस्त आणि महागडे असे दोन्ही प्लॅन ऑफर करतेय. जर तुमच्या कुटुंबात चार जण जिओची सेवा वापरत असतील तर कंपनीकडे खास प्लॅन आहे. यामध्ये तुम्ही चारही जणांसाठी एकाच रिचार्जचे पैसे देऊन कॉलिंग, इंटरनेट आदी वापरू शकणार आहात. 3 / 7याबरोबरच तुम्हाल OTT बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. जिओचा हा प्लॅन पोस्टपेड पोर्टफोलिओचा एक भाग आहे. यासाठी युजरना बिलिंग सायकलमध्ये ९९९ रुपये खर्च करावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 200GB डेटा मिळतो. 4 / 7डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सला 10 रुपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल. या प्लानमध्ये यूजर्सना 500GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळते. म्हणजे या महिन्यात उरलेला डेटा पुढील महिन्यात वापरू शकता. 5 / 7या प्लॅनमध्ये मुख्य युजरशिवाय, इतर तीन कनेक्शन देखील वापरले जाऊ शकतात. ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. प्लॅन खरेदी करणारे Jio वापरकर्ते कंपनीच्या 5G सेवेसाठी पात्र असतील. 6 / 7जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये युजरला नेटफ्लिक्स (मोबाइल प्लॅन) चे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय यूजर्स Amazon Prime चे सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात. प्लॅनमध्ये यूजर्सला एक वर्षासाठी प्राइम व्हिडिओचा अॅक्सेसही मिळेल.7 / 7याशिवाय युजरला जिओ अॅप्सचाही मोफत अॅक्सेस मिळतो. Jio Cinema, Jio TV, Jio Cloud आणि Jio Security च्या सेवा वापरता येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications