शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Reliance Jio Top Trending Plan : 299 रुपयांपासून सुरू होणारे जिओचे शानदार प्रीपेड प्लॅन; 912 जीबीपर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉल आणि बरेच काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:07 PM

1 / 7
रिलायन्स जिओ (Reliance Jio) जवळ असे अनेक प्रीपेड प्लॅन आहेत, ज्यात इंटरनेट डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना विविध कॅटॅगरीतील प्लॅन ऑफर करते. जिओ कंपनीकडेही टॉप ट्रेंडिंग प्लॅन (Top Trending Plan)आहेत, जे वेगवेगळ्या किमतीच्या सेगमेंटमध्ये येतात. जिओच्या टॉप ट्रेंडिंग प्लॅनची किंमत 299 रुपयांपासून सुरू होते आणि 2,999 रुपयांपर्यंत जाते.
2 / 7
जिओच्या 299 रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. या प्रीपेड पॅकमध्ये एकूण 56GB डेटा देण्यात आला आहे. दैनंदिन डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत असते. या प्लॅनमध्ये अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील देण्यात आले आहेत. जिओच्या प्रीपेड प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सबस्क्रिप्शन मोफत दिले जातात.
3 / 7
रिलायन्स जिओच्या 333 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये एकूण 42 जीबी डेटा उपलब्ध आहे. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत राहते. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी मोफत मिळते. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जाते.
4 / 7
रिलायन्स जिओच्या 499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहक एकूण 56 जीबी डेटा वापरू शकतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये, दररोज उपलब्ध डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत कमी होते. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात. याशिवाय, ग्राहक देशभरात अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टार, जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे. दरम्यान, डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत दिले जाते.
5 / 7
रिलायन्स जिओच्या 666 रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये ग्राहक एकूण 126 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. दररोज प्राप्त होणारा डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps पर्यंत राहतो. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स मिळतात. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाऊडची सुविधाही ग्राहकांना देण्यात आली आहे.
6 / 7
रिलायन्स जिओच्या 719 रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच ग्राहक एकूण 168 जीबी डेटा वापरू शकतात. प्लॅनमधील दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत राहतो. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल मिळतात. या प्रीपेड पॅडमध्ये दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि Jio Cloud च्या सुविधाही या प्रीपेड प्लॅनमध्ये देण्यात आल्या आहेत.
7 / 7
जिओच्या 2,999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. ग्राहक एकूण 912.5 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध आहेत. याशिवाय, दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. कंपनी ग्राहकांना डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत देते. याशिवाय JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन सुद्धा या रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय