शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Samsung नं सादर केले 4 ‘बाहुबली’ फोन्स, दमदार बॅटरी आणि शानदार कॅमेरा

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 5:33 PM

1 / 8
सॅमसंग गॅलेक्सी ए53 5जी स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एफएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड 12 फोन एक्सनॉस 1280 चिपसेट आणि माली-जी68 जीपीयूसह बाजारात आला आहे. यात 25वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी मिळते.
2 / 8
फोनच्या मागे 64MP + 12MP + 5MP + 5MP चा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरा आहे. Galaxy A53 5G च्या 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 34,499 रुपये आणि 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे.
3 / 8
सॅमसंग गॅलेक्सी ए33 5जी मध्ये 6.4-इंचाचा एफएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात Exynos 1280 प्रोसेसरसह 8GB रॅम, 256GB मेमरी मिळते. यातील 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
4 / 8
फोनच्या मागे 48MP + 8MP + 5MP + 2MP चा क्वॉड सेटअप आहे. 32MP चा सेल्फी कॅमेरा आहे. किंमत मात्र कंपनीनं सांगितलं नाही. या फोनची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही.
5 / 8
लाँच झालेल्या स्मार्टफोन्स पैकी सॅमसंग गॅलेक्सी ए13 सर्वात स्वस्त फोन आहे. यात 6.6 इंचचा एलसीडी डिस्प्ले मिळतो. हा अँड्रॉइड 12 फोन एक्सनॉस 850 चिपसेटवर चालतो. फोनच्या मागे 50MP + 5MP + 2MP + 2MP चा क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यात 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
6 / 8
फोनमध्ये 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरी मिळते. 4GB/64GB (14,999 ₹), 4GB/128GB (15,999 ₹) आणि 6GB/64GB (17,499 ₹).
7 / 8
सॅमसंग गॅलेक्सी ए23 मध्ये 6.6 इंचाचा एलसीडी डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. अँड्रॉइड 12 स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटवर चालतो. यात 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 5,000एमएएचची बॅटरी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
8 / 8
फोनच्या मागे 50MP + 5MP + 2MP + 2MP कॅमेरा सेटअप आहे. सोबत 8MP चा सेल्फी शुटर मिळतो. Galaxy A23 चा 6GB/128GB व्हेरिएंट 19,499 रुपये आणि 6GB/128GB मॉडेल 20,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.
टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन