Samsung Galaxy A9 (2018) Launched in India Starting Rs. 36,990
एक, दोन नव्हे, तर चक्क चार कॅमेऱ्यांचा फोन; सॅमसंगचा Galaxy A9 भारतात लाँच By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 6:50 PM1 / 12तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन गॅलक्सी ए 7 2018 हा लाँच केल्यानंतर सॅमसंगनं 20 नोव्हेंबर रोजी भारतात गॅलक्सी ए9 2018 हा मोबाइल ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. 2 / 12दुपारी 12 वाजता गुरुग्रामधल्या एका कार्यक्रमात या मोबाइल फोनचं अनावरण करण्यात आलं. 3 / 12सॅमसंग गॅलक्सी ए9 2018मध्ये 4 रिअर कॅमेरे दिले असून, एक फ्रंट कॅमेराही आहे. तसेच या फोनला 6.3 इंचाचा इनफिनिटी डीस्प्ले देण्यात आला आहे. 4 / 12सॅमसंग गॅलक्सी ए9 2018 या मोबाइल फोनचं गेल्या महिन्यात मलेशियातील क्वालालंपूरमध्ये लाँचिंग झालं होतं. 5 / 12या मोबाइल फोनमध्ये अँड्रॉइड 8.1 ओरिया वर्जन दिलं आहे. ज्याचं रिझॉल्युशन 1080x2280 पिक्सल आहे. 6 / 12या मोबाइलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबीचं स्टोअरेज दिलं असून, 512 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येते. 7 / 12सॅमसंग गॅलक्सी ए 9 2018मध्ये 4 रिअर कॅमेरे बसवण्यात आले असून, ज्यात 24 मेगापिक्सलच्या f/1.7 अपर्चरचा मुख्य कॅमेरा दिला आहे. 8 / 12Galaxy A9 (2018)मध्ये 3800 एमएएच बॅटरी देण्यात आली असून, फास्ट चार्जिंगला ते सपोर्ट करते. त्याच बरोबर कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, ब्लूटूथ v5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी और 3.5 एमएमचा हेडफोन देण्यात आला आहे. 9 / 12फोनच्या पावर बटनमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. हा फोन बब्बलगम पिंक, कॅव्हियर ब्लॅक आणि लेमोनेड ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 10 / 12दुसरी लेन्स 10 मेगापिक्सलची असून, टेलिफोटोच्या माध्यमातून ज्यात 2Xपर्यंत कॅमेरा झुम करता येतो. तिसरी लेन्स 8 मेगापिक्सलची असून, अल्ट्रा वाइड अँगलही दिला आहे. 11 / 12चौथी लेन्स 5 मेगापिक्सलची आहे. चारही कॅमेरे एका रेषेत खाली-वर आहेत. 12 / 12सॅमसंग गॅलक्सी ए9 2018ची किंमत 39,000 रुपये इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. परंतु तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनच या मोबाइलची खरी किंमत समजू शकेल. आणखी वाचा Subscribe to Notifications