शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता नो टेन्शन! Facebook आणि Twitter पासून 'असा' वाचवा पर्सनल डेटा; 'या' 6 टिप्स तुम्हाला ठेवतील सेफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 10:23 AM

1 / 16
फेसबुक आणि ट्विटरचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या हॅकर्स युजर्सना विविध पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रायव्हसीचा मुद्दा हा जास्त चर्चेत आला आहे.
2 / 16
आपली वैयक्तिक माहिती ऑनलाईन शेअर करताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाचा वापर हा हमखास केला जातो. मात्र त्याचा वापर करताना वेळळीच सावध होणं गरजेचं आहे. अन्यथा मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.
3 / 16
फेसबुक आणि गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवर अशा काही जाहिराती डिझाइन केल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये तुमच्या खासगी माहितीवर लक्ष ठेवलं जातं. यामुळे तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
4 / 16
सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेतली असता वैयक्तिक डेटा चोरणार्‍या वेबसाईट्सला रोखू शकता. तसेच यापासून बचाव होऊ शकतो. फेसबुक आणि ट्विटरपासून खासगी डेटा कसा वाचवायचा हे जाणून घेऊया.
5 / 16
तुम्ही वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरातदारांवर बंदी घालू शकता. यामध्ये प्रायव्हसी आणि जाहिरात सेटिंग्जद्वारे तुम्ही लक्ष ठेऊ शकता.
6 / 16
तुम्ही ट्विटरवर ‘Off-Twitter Activity’ आणि फेसबुकवर ‘Ads Shown off of Facebook’ अशा पद्धीतीने सोशल मीडियावर ट्रॅकिंग आणि जाहिराती थांबवू शकता.
7 / 16
तुमच्या फोटोंमधूनदेखील लोकेशन ट्रॅकिंग, हिस्ट्री, अगदी मेटाडेटासुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅप्सना माहिती गोळा करण्याची परवानगी देतं. त्यामुळे आपल्या सर्व हालचालींना इतरांना ट्रक करण्यापासून रोखण्यासाठी लोकेशन ट्रॅकिंग बंद करा.
8 / 16
तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही सेटिंग्ज – प्रायव्हसी – लोकेशन शेअरिंग बंद करू शकता. तसेच अँड्रॉईडवर देखील लोकेशन शेअरिंग बंद करू शकता.
9 / 16
Twitter आणि TikTok सारख्या काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमची माहिती शेअर करण्यासाठी लॉग इन करण्याची गरज नाही.
10 / 16
लॉग इन केल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर तुमचा डेटा स्टोर केला जातो आणि तो इतरांकडून वाचला जातो.
11 / 16
अनेक अ‍ॅप्स तुमचं लोकेशन ऑन ठेवण्यासाठी विचारतात. पण त्यामुळे तुमचा डेटा चोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे महत्त्वाचे अ‍ॅप्स आणि गेम्सची परवानगी रद्द करा.
12 / 16
सध्या सोशल मीडियावर आणि प्रत्येक अ‍ॅपवर अनेक जाहिराती येत असतात. यावर क्लिक करू नका. यानेदेखील तुमचा डेटा लिक होऊ शकतो.
13 / 16
जाहिरातीच्या माध्यमातून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत असतात. त्यामुळे यापासून थोडं लांब राहा.
14 / 16
बर्नर ईमेल म्हणजे वेगळा ईमेल आयडी. आपल्या वैयक्तिक ईमेल पत्त्याव्यतिरिक्त, तुम्ही एक स्वतंत्र आयडीसुद्धा तयार करू शकता. जो इतर कामांसाठी वापरला जाईल.
15 / 16
इतर कंपन्या त्यामुळे तुम्हाला ट्रॅक करू शकत नाहीत. तसेच या मेल आयडी तुमच्या कॉमन ईमेलसोबत लिंक करून नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
16 / 16
फेसबुक आणि ट्विटरवर अनेकजण अॅक्टिव्ह असून सतत विविध फोटो, माहिती, व्हिडीओ हे पोस्ट केला जातात. मात्र याचा वापर करताना खूप सतर्क असणं अत्यंत गरजेचं आहे.
टॅग्स :FacebookफेसबुकTwitterट्विटरSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान