she live one year without a smartphone; won 72 lakh
स्मार्टफोनशिवाय एक वर्ष राहिली; 72 लाख जिंकले By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 9:29 AM1 / 6आज स्मार्टफोनशिवाय एक क्षणही आपण राहू शकत नाही. अनेकजण तर महागड्या आयफोनसाठी किडन्या विकतात. पण एका 29 वर्षाच्या तरुणीने एक वर्ष स्मार्टफोन शिवाय घालवले आहे. या बदल्यात तिला 72 लाखांचे बक्षिसही मिळाले आहे. 2 / 6न्यूयॉर्कची 29 वर्षीय महिला एलाना मुगदान हीने हे बक्षिस मिळविले आहे. खरेतर हे एक चॅलेंज होते. स्क्रॉल फ्री फॉर ए इयर चॅलेंजमध्ये तिने सहभाग घेतला होता. या दरम्यान तिने वर्षभर स्मार्टफोनचा वापर केला नाही. तिच्याकडे आयफोन 5 एस होता. तिने हा फोन न वापरता फिचर फोनचा वापर केला. 3 / 6स्क्रॉल फ्री फॉर ए इयर चॅलेंज जिंकल्यानंतर तिला 1,00,000 डॉलर म्हणजेच 72 लाख रुपये मिळणार आहेत. या पैशांसाठी तिला लाय डिटेक्टर टेस्ट करावी लागणार आहे. यानंतरच तिला पैसे मिळणार आहे. 4 / 6गेल्या वर्षी व्हिटामिन वॉटरने एक स्पर्धा ठेवली होती. स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसन सोडविण्याची ती एक कल्पना होती. व्हिटामिन वॉटरने सांगितले की तुम्ही जर 365 दिवस स्मार्टफोनचा वापर करणार नसाल तर 1 लाख डॉलरचे बक्षिस मिळेल. 5 / 6स्पर्धेत भाग घेण्याची शेवटची तारीख 8 जानोवारी 2019 होती. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला #nophoneforayear आणि #contest असे हॅशटॅग वापरून ट्विट आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचे होते. 6 / 6एलानाला याकाळात अनेक संकटांचाही सामना करावा लागला. मात्र, तरीही तिने स्मार्टफोनला हात लावला नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications