शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२० रुपयांत ९० दिवस सिम कार्ड अ‍ॅक्टीव्ह राहणार नाही, सत्य काही वेगळेच; ट्रायने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:47 IST

1 / 9
Sim Card : काही दिवसापूर्वी सिम कार्ड बाबत एक बातमी समोर आली होती. दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांना आता जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्यांना आता फक्त २० रुपये खर्च करावे लागणार आहेत, अशी बातमी समोर आली होती. याबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2 / 9
ट्रायने ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. ट्रायने असा कोणताही नियम बनवला नसल्याचे म्हटले आहे.
3 / 9
काही दिवसापूर्वी याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या बातमीचे पीआयबीने फॅक्ट चेक केले आहे. सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली आहे, या बातमीत दावा केली आहे की, ट्राय ने रिचार्ज केले नाही तरी ९० दिवसापर्यंत सिम कार्ड सुरू राहिलं याबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केल्याचा दावा केला आहे.
4 / 9
याबाबतील अनेक माध्यमांनीही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. यामुळे वापरकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. आता यावर ट्रायने आणि पीआयबीने स्पष्टीकरण दिले आहे.
5 / 9
२० रुपयांमध्ये सिम कार्ड अॅक्टीव्ह राहण्याची सुविधा, टेलिकॉम कंपन्या या पद्धतीच्या कोणत्याही सेवा देत नाहीत. ट्रायनेही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ट्रायने असा कोणताही नियम नसल्याचे म्हटले आहे.
6 / 9
काही दिवसापूर्वी माध्यमांमध्ये सिम कार्डबाबत बातमी आली होती. यामध्ये एखादे सिम ९० दिवसांसाठी निष्क्रिय राहिले आणि तरीही त्यात प्रीपेड बॅलन्स असेल, तर सिम सक्रिय करण्याची मुदत ३० दिवसांसाठी वाढवण्यासाठी २० रुपये कट केले जातील असा दावा केला होता. जर बॅलन्स नसेल तर सिम कायमचे बंद होईल अशं सांगितले होते.
7 / 9
सेवा बंद केली तर कॉल करणे/रिसीव्ह करणे किंवा इंटरनेट अॅक्सेस करणे बंद होते. निष्क्रिय केल्यानंतर, सिमशी संबंधित नंबर रिसायकल केला जाईल आणि नवीन वापरकर्त्यांना दिला जाईल. आता या बातमीबाबत सत्य समोर आले आहे.
8 / 9
काही दिवसापूर्वी जिओने १९५८ रुपयांचा प्लॅन आणले आहेत. यामध्ये संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित कॉलिंग आणि ३६०० एसएमएस देण्यात आले.
9 / 9
ट्रायच्या कारवाईनंतर, जिओने १७४८ रुपयांचा एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. या अपडेटेड प्लॅनची ​​वैधता ३३६ दिवस आहे. यात अजूनही ३६०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा समावेश आहे.
टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइल