शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Snapchat ने लाँच केला ‘पिटुकला’ ड्रोन कॅमेरा, आकाशातून घेईल झक्कास फोटो

By सिद्धेश जाधव | Published: April 29, 2022 5:51 PM

1 / 6
सोशल मीडिया कंपनी स्नॅपचॅट नवनवीन टेक प्रोडक्ट बाजारात सादर करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीनं स्मार्ट ग्लासेस (चष्मा) सादर केले होते. आता एक पॉकेट साईज ड्रोन कॅमेरा Pixy Flight Pack सादर केला आहे. जो सहज कुठेही नेता येतो.
2 / 6
ड्रोनने काढलेले फोटो आणि व्हिडीओज स्नॅपचॅट मेमरीमध्ये पाठवले जातील, तिथे ते एडिट देखील करता येतील. या मीडिया फाईल्स स्नॅपचॅटसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील शेयर करता येतील.
3 / 6
Pixy Flight Pack मध्ये 12 मेगापिक्सलचा एक कॅमेरा सेंट देण्यात आला आहे. सोबत 16GB ची स्टोरेज देखील मिळते. त्यामुळे हा ड्रोन 1000 फोटोज आणि 100 व्हिडीओज साठवून ठेवू शकतो.
4 / 6
Pixy ड्रोन सोबत कोणताही कंट्रोलर मिळत नाही, कारण या कॅमेऱ्याचा वर जाण्याचा आणि खाली येण्याचा मार्ग ठरलेला आहे. जो फक्त एक बटन दाबून अ‍ॅक्टिव्हेट होतो, उडून तुमचे फोटोज काढल्यानंतर हा कॅमेरा तुमच्या हातावर लँड होईल.
5 / 6
जर तुम्ही दीर्घकाळ Pixy Flight Pack वापरणार असाल तर तुम्ही कॅमेरामध्ये मिळणाऱ्या बॅटरी व्यतिरिक्त आणखी एक बॅटरी देखील विकत घेऊ शकता. जिची किंमत 19.99 डॉलर्स अर्थात 1,528 रुपये आहे.
6 / 6
स्नॅपचॅटनं सादर केलेल्या या उडणाऱ्या कॅमेऱ्याची किंमत 249.99 डॉलर्स म्हणजे सुमारे 19,000 रुपये आहे. जे लोक स्नॅपचॅटचे चाहते आहेत ते लोक या ड्रोन कॅमेऱ्याचा विचार करू शकतात.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान