शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

...म्हणून उन्हाळ्यात स्मार्टफोनवर गुगल मॅप्स वापरू नये; अशी घ्या फोनची काळजी

By सिद्धेश जाधव | Published: March 31, 2022 4:42 PM

1 / 11
स्मार्टफोन पाण्यात पडला किंवा पाणी स्मार्टफोनवर पडलं, परिणाम एकच होतो. त्यामुळे वॉटरप्रूफ फोन केस विकत घ्या. खासकरून तुम्ही जर समुद्र किनारी किंवा स्विमिंग पूल असलेल्या ठिकाणी सुट्ट्या घालवायला जाणार असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. वॉटरप्रूफ केस नसताना स्मार्टफोन पाण्यात पडला तर सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून फोन 24 तास स्विच ऑफ करून तांदळात ठेवावा.
2 / 11
उन्हाळ्यात आपल्याला घाम खूप येतो. या सीजनमध्ये मॉइस्चरायजर आणि सनस्क्रीनचा वापर देखील वाढतो. या सर्व गोष्टी तुमच्या स्मार्टफोनपर्यंत पोहचू शकतात त्यामुळे फोन चिकट होऊ शकतो. त्यामुळे फोन मायक्रोफायबर क्लॉथनं स्वच्छ पुसून घ्यावा. टिश्यू पेपरमुळे स्क्रीनवर स्क्रॅच येऊ शकतात.
3 / 11
बाजारात उपलब्ध असलेले फोन केस धूळ आणि वाळूचा विचार करत नाहीत. स्क्रीनवर स्क्रॅच आणि माईक-हेडफोन जॅक ब्लॉक करू शकतात. त्यामुळे वाळू आणि धुळीपासून स्मार्टफोनचं संरक्षण करा.
4 / 11
स्मार्टफोन कारमध्ये सुरक्षित राहील असं तुम्हाला वाटत असेल. परंतु त्यामुळे हळहळू तुमचा फोन खराब होऊ शकतो. फोन कारमध्ये न ठेवता सोबत घेऊन चला कारण उन्हामुळे कार तापून स्मटफोन देखील तापू शकतो.
5 / 11
एकावर एक इलेकट्रोनिक्स डिवाइस कधीच ठेऊ नये. हे डिवाइस उष्णता उत्सर्जित करतात, त्यात उन्हाळ्याच्या गर्मीची भर पडल्यास तुमचा स्मार्टफोनचे आयुष्य कमी होऊ शकते.
6 / 11
सर्व इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस वापरत असताना गरम होतात. उन्हात स्मार्टफोन जास्त काळ ठेवल्यास ओव्हरहिट होऊन बॅटरी खराब होऊ शकते. जर तुमचा फोन ओव्हरहिट झाला तर त्याला सावलीत ठेऊन थंड होऊ द्यावा.
7 / 11
उन्हात असताना स्मार्टफोनवर गेम खेळू नका कारण प्रोसेसर पावरचा जास्त वापर होत असल्यामुळे उष्णता उत्सर्जित होते. त्यात उन्हाची भर पडली तर तुमचा फोन तव्यासारखा तापेल.
8 / 11
प्रवासात गुगल मॅप खूप उपयुक्त ठरतं परंतु त्यासाठी वापरले जाणारे नेव्हिगेशन टूल्स आणि जीपीएसमुळे स्मटफोन गरम होतो. गरज नसल्यास नेव्हिगेशन अ‍ॅप्सचा वापर करू नये.
9 / 11
ज्या फंक्शन्स आणि अ‍ॅप्सची गरज नसेल ते बंद करून ठेवावे. यात ब्लूटूथ, वाय-फाय इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे प्रोसेसिंग पावर कमी वापरली जाते आणि फोन थंड राहतो.
10 / 11
फोन बंद केल्यामुळे फक्त तुमच्या स्मार्टफोनमधून उत्सर्जित होणारी गर्मी कमी होत नाही तर तुम्हाला तुमच्या सुट्ट्यांचा आनंद घेता येतो. पूर्णपणे बंद करण्याऐवजी तुम्ही एरोप्लेन मोडचा वापर देखील करू शकता. त्यामुळे देखील तुमचा स्मार्टफोन थंड राहू शकतो.
11 / 11
तुमचा स्मार्टफोन एक संवेदनशील डिवाइस आहे. जास्त गर्मी तुमच्या स्मार्टफोनच्या सर्किट बोर्डचं नुकसान करू शकते किंवा बॅटरी ओव्हरहिट होऊ शकते. वरील टिप्समुळे तुम्ही नवीन फोन घेण्यापासून किंवा रिपेअरिंगपासून वाचू शकता.
टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान