शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Stabilizer Light Bill: एसी, फ्रिजचा स्टॅबिलायझर किती वीज खातो? 10 तास सुरु ठेवला तर... ही आहे स्मार्ट चॉईस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 2:54 PM

1 / 7
गर्मीचे दिवस सुरु झाले आहेत. यामुळे बहुतांश घरांमध्ये एसी, फ्रिज हायवर सुरु झाले आहेत. यामुळे वीज कमी-जास्त होऊ लागली आहे. अशावेळी लो किंवा हाय व्होल्टेजमुळे उपकरण खराब होऊ नयेत म्हणून स्टॅबिलायझर लावला जातो. सध्या काही फ्रिजमध्ये बिल्ट इन स्टॅबिलायझर लावले जात आहेत. हे स्टॅबिलायझर देखील वीज खातात का? असेल तर किती?
2 / 7
लो-हाय व्होल्टेजमुळे टीव्ही, फ्रिज, एसी खराब होऊ शकतात. या खर्चापासून वाचण्यासाठी इलेक्ट्रीशिअन स्टॅबिलायझर वापण्याचा सल्ला देतात. अनेकजण तो लावतातही. कारण पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात याचा फटका बसतो. सर्वात आधी स्टॅबिलायझर कसे काम करतो ते पाहुया...
3 / 7
व्होल्टेज स्टॅबिलायझर हे व्होल्टेजला स्थिर करतात. जर व्होल्टेजमध्ये चढ-उतार असेल तर त्याला गरज असलेल्या व्होल्टेजपर्यंत अॅडजस्ट करतात. त्यानंतर तो वीज प्रवाह पुढे उपकरणाला सोडला जातो. असे कार्य इलेक्ट्रोमॅग्नोटीक रेग्युलेटरवर केले जाते. यामध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मरसोबत टॅप चेंजर्सचा वापर केला जातो. जर व्होल्टेज योग्य नसेल तर टॅपला स्विच केले जाते.
4 / 7
स्टॅबिलायझलराही त्याचे काम करायला वीज लागते, बरं का... आता किती वीज लागते ते त्या स्टॅबिलायझरवर अवलंबून असते. सामान्यत: स्टॅबिलायझर हे 95-98% एनर्जी इफिशिअंट असतात. म्हणजेच ते पाच ते दोन टक्के वीज वापरतात. जर तुमच्याकडे 1 kVA किंवा 1000 VA चा स्टॅबिलायझर असेल तर ५० वॉटची (पिकवर असल्यास) वीज घेईल.
5 / 7
जर तुम्ही हा स्टॅबिलायझर १० तासांसाठी सुरु ठेवला असेल तर तो 0.5 यूनिट वीज वापरेल. जर २४ तासांसाठी वीज वापरली तर तो सव्वा युनिट वीज वापरेल. म्हणजेच फ्रिजला महिनाभर वापरला तर जवळपास ३५ ते ३६ युनिट वीज वापरतो. याचा हिशेब केला तर महिन्याचे बिलही वाढते. हा खूप अधिक वीज वापरली जात असेल तरचा आहे. जर उपकरण कमी वीज वापरत असेल तर १५ ते २० युनिटही लागू शकतात.
6 / 7
स्टॅबिलायझरची कॅपॅसिटी देखील वेगवेगळी असते. यामुळे तो तुमच्या कोणत्या उपकरणाला वापरायचा आहे, त्यानुसार निवडावा. जर कमी वीज लागणारे उपकरण असेल तर 1 kVA चा स्ट्रबिलायझर घेण्याची गरज नाही. कमी क्षमतेचा घ्यावा. यानुसार त्यालाही वीज कमी लागेल.
7 / 7
दुसरे महत्वाचे म्हणजे सगळ्याला एकच स्टॅबिलायझर वापरण्यापेक्षा प्रत्येक उपकरणाला त्याच्या त्याच्या लोड प्रमाणे योग्य स्टॅबिलायझर वापरावा.
टॅग्स :electricityवीज