शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

"आपला फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर Whatsapp पासून दूर राहा"; कुणी दिला इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:31 AM

1 / 6
आपला फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर Whatsapp पासून दूर राहा. कोणतेही मेसेजिंग ॲप वापरा; पण Whatsapp वापरू नका, असा थेट इशारा ‘टेलिग्राम’चे संस्थापक पॉवेल ड्युरोव यांनी दिला आहे. ‘टेलिग्राम’ हे व्हॉट्स ॲपसारखेच एक मेसेजिंग ॲप आहे. (फोटो - HT Tech)
2 / 6
गेल्या आठवड्यात Whatsapp ने एक सुरक्षाविषयक सल्ला जारी करून एका हॅकिंग व्हिडिओपासून सावध राहण्याचा इशारा आपल्या वापरकर्त्यांना दिला होता. याचाच संदर्भ देऊन ड्युरोव यांनी म्हटले की, ‘Whatsapp वापरणाऱ्या व्यक्तीच्या फोनचा संपूर्ण ताबा हॅकर्स घेऊ शकतात.’
3 / 6
ड्युरोव यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट सामायिक करून हा इशारा दिला. त्यांनी म्हटले की, Whatsapp वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात आणू शकणारे काही ना काही मुद्दे दरवर्षी समोर येत असतात.
4 / 6
फोनमध्ये Whatsapp इन्स्टॉल केलेले असेल तर हॅकर्स तुमच्या फोनमधील सर्व डेटापर्यंत सहजपणे पोहोचू शकतात. तुम्ही पृथ्वीवरील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असाल, तर तुम्हाला अशा बाबींनी काही फरक पडणार नाही; पण सामान्य माणसासाठी हे धोकादायक आहे.
5 / 6
सरकार, कायदेपालन संस्था आणि हॅकर्सना एन्क्रिप्शन आणि अन्य सुरक्षा अडथळे पार करून लोकांच्या फोनचे संपूर्ण नियंत्रण मिळविणे सोपे व्हावे, यासाठी त्रुटी ठेवण्यात आल्या. तुम्ही कोणतेही मेसेजिंग ॲप वापरा, फक्त Whatsapp पासून दूर राहा, एवढेच मला सांगायचे आहे, असे ड्युरोव म्हणाले.
6 / 6
मेटाच्या प्रवक्त्याने ड्युरोव यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रवक्त्याने सांगितले की, हे आरोप मूर्खपणाचे आहेत. Whatsapp सुरक्षित आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप