शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

DSLR Like Photography on Smartphone: या दिवाळीत स्मार्टफोनद्वारे DSLR सारखे फोटो काढा; हे गॅजेट्स कामी येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:46 PM

1 / 8
दिवाळीमध्ये फोटोग्राफी (Photgraphy) होणार नाही असे होऊच शकत नाही. तुमच्याकडे कोणताही स्मार्टफोन (Smartphone) असुदे तुम्हाला तुमच्या मनाला भावेल असे फोटो निघत नाहीत. यामुळे तुमच्या दिवाळीच्या आठवणी खराब होऊ शकतात. जर तुम्हाला डीएसएलआर (DSLR) सारखे फोटो काढायचे असतील तर त्यासाठी DSLR कॅमेरा असणे गरजेचे नाही.
2 / 8
आम्ही तुम्हाला अशा काही खास गॅजेटबद्दल सांगणार आहोत. ज्याचा स्मार्टफोनसोबत वापर करून तुम्ही चांगली फोटोग्राफी करू शकता. या गॅजेटची किंमतही स्वस्त आहे आणि तुमच्या बजेटमध्ये देखील आरामात फिट होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणते गॅजेट आहेत.
3 / 8
स्मार्टफोन कॅमेराच्या लेन्सची क्षमता अनेकदा कमी असते. अशावेळी रात्रीच्यावेळी फोटोग्राफी करणे किंवा इनडोअर फोटोग्राफी करणे कठीण असते. तुमच्या कॅमेराची लेन्स डीएसएलआरसारखी बनविता येते हे तुम्हाला माहिती आहे का.
4 / 8
बाजारात स्मार्टफोनसाठी चांगल्या कॅमेरा लेन्स उपलब्ध आहेत. याचा वापर करून तुम्ही या दिवाळीतच नाही नेहमी चांगली फोटोग्राफी करू शकता.
5 / 8
सेल्फी स्टिक आजकाल मार्केटमध्ये कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यासोबत एक रिमोटही दिला जातो. जर तुम्ही मित्रांचा गोतावळा, कुटुंबासोबत एकत्र फोटोग्राफ घेत असाल तर चांगल्या क्वालिटीचे पिक्चर घेऊ शकता. जे हाताने क्लिक करून घेता येत नाहीत.
6 / 8
गिम्बलला सोप्या भाषेत कॅमेरा स्टॅबिलायझर म्हणतात. जर तुम्ही मुव्हिंग फोटोग्राफी करत असालतर गिम्बल तुम्हाला चांगली पिक्चर क्वालिटी देते. प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये याचा वापर खूप काळापासून होतो. मात्र, लोक आता नेहमीच्या वापरासाठी देखील कमी किंमतीत हे खरेदी करू शकतात.
7 / 8
गोरिल्ला ट्राइपॉड हे एक खूपच स्वस्तात खरेदी करता येईल. जर तुम्ही फोटोग्राफीसाठी याचा वापर करत असाल तर पिक्चर क्वालिटी चांगली करता येईल. कारण कॅमेरा लेन्स खूप स्टेबल राहते. यामुळे पिक्चर क्वालिटी चांगली येते.
8 / 8
कॅमेरा लेन्स विविध प्रकारच्या विविध रेंजच्या येतात. तुम्हाला नेमकी कसा फोटो काढायचा आहे यावर त्या लेन्सचा वापर अवलंबून आहे. ऐन दिवाळीत अशा वस्तू घेऊ नका. त्या आधी घेतल्या तर वापरून त्याचा अनुभव घेता येईल. शिवाय इंटरनेटवर देखील ते कसे वापरावे याची माहिती उपलब्ध आहे. यामुळे या दिवाळीत तुम्हाला चांगल्या फोटोंचा आनंद घेता येईल.
टॅग्स :Diwaliदिवाळी 2021