Tata Group Super App Tata Neu launched With Many Features
Tata Neu: किराणापासून दागिन्यांची खरेदी फक्त एकाच अॅपमध्ये; औषधही घरपोच देणार टाटा By सिद्धेश जाधव | Published: April 09, 2022 6:36 PM1 / 7अगदी सोप्प्या शब्दांत सांगायचं झालं तर सुपर अॅप म्हणजे अनेक सुविधा एकाच अॅपमध्ये देणाऱ्या अॅपला सुपर अॅप असं म्हणतात. हे अॅप्स 10 ते 50 अॅप्सची कामं करतात त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनवरील स्टोरेज वाचते आणि एकाच ठिकाणी अनेक सुविधा उपलब्ध होतात. 2 / 7Tata Neu अॅप गुगल प्ले-स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवरून मोफत डाउनलोड करता येईल. आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हे अॅप डाउनलोड केलं आहे. 3 / 7या अॅपवरून टाटा ग्रुपच्या अनेक वेंचरच्या सेवा आणि उत्पादनांचा आस्वाद या अॅपवर घेता येईल. इथे एयर आशिया, एयर इंडिया, विस्ताराच्या विमान तिकीट बुक करता येईल. तसेच बिगबास्केटवरून किराणा आणि भाज्या विकत घेता येतील. क्रोमामधून गृहपयोगी वस्तू तर टाटा 1 एमजीवरून औषध घरपोच येतील. 4 / 7Tata Neu अॅपमध्ये हॉटेल बुकिंगसाठी आयएचसीएल, जेवण मागणीसाठी क्यूमिन, कॉफीसाठी स्टारबक्स आणि कपड्यांसाठी टाटा क्लिक आणि वेस्टसाइडचा पर्याय देखील उपलब्ध आहे. या अॅपमध्ये टायटन, तनिष्क आणि टाटा मोटर्सचा पर्याय देखील जोडण्यात येईल. 5 / 7Tata Neu अॅपमधील Stories सर्विसमध्ये डिजिटल मॅगजीन उपलब्ध होतील. ज्यात लाईफस्टाईल आणि फॅशन से संबंधित लेख, व्हिडीओचा समावेश असेल.6 / 7टाटा पे च्या माध्यमातून तुम्ही बिल, रिचार्ज इत्यादींच पेमंट करता येईल. तसेच अन्य पेमेंट अॅप्स प्रमाणे तुम्ही यूपीआय पेमेंटचा वापर देखील करू शकता. 7 / 7टाटा ग्रुपच्या नीओ अॅपच्या माध्यमातून शॉपिंग केल्यावर ग्राहकांना NeuCoins मिळतील. एक NeuCoin ची किंमत 1 रुपये असेल. असे अमर्याद NeuCoins शॉपिंग करून मिळवता येतील. तसेच आगामी NeuPass फिचरच्या माध्यमातून 5% अतिरिक्त NeuCoins मिळतील. आणखी वाचा Subscribe to Notifications