शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Facebook अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित आहे का?; 'या' सिक्युरिटी टिप्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 3:41 PM

1 / 8
फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. मात्र फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला आहे त्यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. Facebook अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' सिक्युरिटी टिप्स फायदेशीर ठरतील.
2 / 8
फेसबुक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपला पासवर्ड बदला. जगभरात लाखो लोक त्यांच्या ई-मेल, स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक आणि दुसऱ्या डिवाईसला सुरक्षित करण्यासाठी कमजोर आणि सहजपणे लक्षात येणारे पासवर्ड ठेवतात. मात्र असा पासवर्ड ठेवू नका. नंबर, अक्षर आणि चिन्हं असलेला पासवर्ड ठेवा.
3 / 8
युजर्स अनेकदा सर्व अकाऊंटसाठी एकच पासवर्ड ठेवतात. मात्र वेगवेगळ्या लॉग-इनसाठी वेगवेगळ्या पासवर्डचा वापर करावा. सोपे पासवर्ड असल्यास हॅकर्सना ते हॅक करणं सहज शक्य होते.
4 / 8
फेसबुक अकाऊंट चुकून फोनमध्ये अथवा संगणकावर ओपन राहीलं तर इतर व्यक्ती त्याचा वापर करू शकतात. तसेच तुमच्या अकाऊंटचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता अधिक असते.
5 / 8
फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड कोणालाही कळू नये यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन टर्न ऑन करा. यामुळे तुमचे फेसबुक अकाऊंट सुरक्षित राहील.
6 / 8
फेसबुकवर अनेक जण आपला मोबाईल नंबर देत असतात. मात्र तुम्हाला तुमचा नंबर शेअर करायचा नसल्यास अ‍ॅप बेस्ड ऑथेंटिकेशनचा वापर करा.
7 / 8
अ‍ॅप बेस्ड ऑथेंटिकेशनमुळे प्रत्येक वेळी फेसबुकवर लॉग इन केल्यानंतर एक वन टाइम कोड जनरेट केला जाईल. ज्यामुळे युजर्सचे फेसबुक अकाऊंट सुरक्षित राहील.
8 / 8
इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकने आपल्या 20 ते 60 कोटी युजर्सचा पासवर्ड टेक्स्ट फॉरमॅटमध्ये सेव्ह करुन ठेवला होता. हाच टेक्स्ट फॉरमॅटमधील डेटा फेसबुकच्या कर्मचाऱ्यांमध्ये लीक झाला होता. डेटा लीक झाल्यानंतर फेसबुकने आपली चूक मान्य करत युजर्सला नोटिफिकेशन पाठवून पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे अशी माहिती फेसबुकने दिली. तसेच या डेटा लीक प्रकरणाची पुढील दोन महिन्यात सखोल चौकशी केली जाईल असंही फेसबुकने सांगितले आहे.
टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञान