tech tips and tricks how to check 5g network support in android smartphone airtel reliance jio vi
फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 2:06 PM1 / 7How to Check 5G Network Support: नुकताच देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला. त्यानंतर आता दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कामाला सुरूवातही केली आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्यात 5G सेवा लाँच होणार असल्याचं म्हटलं जातंय 2 / 7दिवाळीपूर्वी रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्या 5G सेवांची घोषणा करू शकतील. 5G सेवा सुरू करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाल्याचंही यापूर्वी कंपन्यांनी सांगितलंय. परंतु लाँचनंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्कचा सपोर्ट मिळणार का? असे काही प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आले असतील.3 / 7असे प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. कारण अनेक लोकांनी 5G स्पेक्ट्रम लिलावापूर्वीच 5G स्मार्टफोनची खरेदी केली होती. अशातच आपल्या मोबाइलमध्ये ही सेवा मिळणार का नाही याबाबत सर्वांनाच प्रश्न पडलाय. 5G स्पेक्ट्रम लिलाव कोणत्या बँड्ससाठी होईल आणि कोणता ऑपरेटर कोणत्या बँडवर सेवा पुरवेल हे स्पष्ट नव्हतं.4 / 7परतु आता कोणती दूरसंचार कंपनी कोणत्या बँडवर सेवा पुरवणार आहे हे स्पष्ट झालंय. परंतु आता तुमच्या जुन्या 5G फोनवर ही सेवा मिळणार का नाही हा प्रश्न आहे. तुम्ही सहजरित्या हे तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.5 / 7सर्वप्रथन तुम्हाला स्मार्टफोनच्या Setting या ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये असलेल्या Connection किंवा Wi-Fi & Network यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर SIM & Network वर जा. काही मोबाइलमध्ये हा ऑप्शन Mobile Network असा दाखवेल.6 / 7त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या Network Mode या ऑप्शनमधून Preferred Network Type हा ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला 5G नेटवर्क असा ऑप्शन दिसेल. जर तुम्हाला त्या ठिकाणी हा ऑप्शन दिसला तर समजा तुमचा फोन 5G सेवांसाठी तयार आहे. जर हवं असेल तर Preferred Network Type वर क्लिक करूनही हे सेटिंग पाहू शकता. 7 / 7तुम्ही दुसऱ्या पद्धतीनंही 5G नेटवर्क सपोर्ट तपासून पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागगेल. त्या ठिकाणी तुम्हाला आपला स्मार्टफोन मॉडेल सर्च करावं लागेल. त्याच्या स्पेसिफिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला 5G बँड्सची माहिती मिळेल. जर भारतीय कंपन्या ज्या बँडवरून सेवा देणार आहेत ते बँड तुमच्या मोबाइलमध्ये असतील तर चिंता करण्याची नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications