Tech tips and tricks How to increase your smartphone internet speed by using sim card in this way
Smartphone Tips And Tricks : स्मार्टफोनमध्ये असं वापरा सिम कार्ड, मिळेल बंपर इंटरनेट स्पीड! By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 1:12 PM1 / 8स्मार्टफोन युजर्सना नेहमीच नेटवर्कच्या समस्येला (Network Problem) तोंड द्यावे लागते. अनेकदा तर इंटरनेटची स्पीड एवढी कमी असते की, काहीच अॅक्सेस करता येत नाही. अगदी व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) पाठवलेला मेसेजही कित्येक मिनिटे अडकून पडतो. यामुळे लोक अनेक वेळा रागाच्या भरात टेलीकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याचा निर्णय घेतात. मात्र, तरीही त्यांची समस्या कायमच राहते.2 / 8'टेन्शन घेण्याची गरज नाही' - ज्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर बदलणे अवघड जाते, ते कस्टमर केअरला फोन करण्याचा प्रयत्न करत राहतात. तरीही त्यांची समस्या सुटत नाही. तुम्हालाही अशीच समस्या जाणवत असेल, तर तुमची ही समस्या आता सुटणार आहे. कारण आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत. याच्या सहाय्याने तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट स्पीड मोठ्या प्रमाणावर वाढेल.3 / 8अशा पद्धतीने काम करते ही ट्रिक? आता आम्ही आपल्याला ज्या ट्रिकसंदर्भात सांगत आहोत, त्यासाठी आपल्याला काही वेगळे अथवा विशेष करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला केवळ आपल्या फोनचे सिम कार्ड बदलावे लागेल. 4 / 8आपल्याला माहीतच आहे की, स्मार्टफोनच्या सिम ट्रेमध्ये आपण एकाच वेळी दोन सिमकार्ड वापरू शकतो. खरे तर, ज्या स्मार्टफोनमध्ये 2 सिम कार्ड वापरण्याचा पर्याय आहे, केवळ त्यासोबतच आपण या ट्रिकचा प्रयोग करू शकता. 5 / 8आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सिम ट्रे वन आणि सिम ट्रे टू, असा पर्याय उपलब्ध आहे. यामुळे सर्वप्रथम, आपल्याला आपले कोणते सिम कार्ड सिम ट्रे 1 मध्ये आहे आणि कोणते सिम कार्ड सिम ट्रे 2 मध्ये आहे हे तपासावे लागेल. 6 / 8जर तुम्ही सिम ट्रे वन मध्ये नॉर्मल कॉलिंग असलेले सिम कार्ड आणि सिम ट्रे टू मध्ये इंटरनेट असलेले सिम कार्ड ठेवले असेल तर तुमच्या फोनचा इंटरनेट स्पीड कमी होण्याचे हे देखील एक कारण असू शकते.7 / 8कस्टमर केअरवालेही सांगतात पद्धत - यामुळे आपण लगेचच आपल्या इंटरनेट सिम कार्डचा स्लॉट चेंज करून ते सिम ट्रे वनमध्ये टाकायला हवे आणि दुसरे सिम कार्ड ट्रेन 2 मध्ये ठेवावे. खरे तर सिम ट्रे वनमध्ये इंटरनेट स्पीड अधिक चांगली मिळते. ही एक प्रसिद्ध पद्धत आहे. तुम्ही तुमचे इंटरनेट सिम कार्ड ट्रे वनमध्ये ठेवताच तुम्हालाही याचा अनुभव येईल. तुम्हीही सुपर फास्ट इंटरनेट स्पीडचा आनंद घ्याल.8 / 8स्लो स्पीडच्या समस्येला कंटाळलेले अनेक लोक यासंदर्भात माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. तर, कस्टमर केअर अधिकाही आपल्या भागातील टॉवरचे लोकेशन तपासून ग्राहकांना हीच पद्धत सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications