technology tips and tricks how to lock your private folders in your desktop
संगणकात खासगी फाईल सुरक्षित ठेवायचीय? असा करा फोल्डर लॉक By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:10 PM1 / 7 संगणकावर काम करत असताना आपण अनेक फाईल सेव्ह करत असतो. त्यातील काही फाईल या अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्या सुरक्षित ठेवणं गरजेचं असतं. संगणकामधील डेटा फाईल आणि डॉक्यूमेंट लॉक करून ठेवता येतात. कसं ते जाणून घेऊया. 2 / 7मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटींग सिस्टममध्ये फाईल्स आणि फोल्डर लॉक करण्यासाठी इनक्रिप्टिंग फाईल्स हा पर्याय देण्यात आला आहे. याच्या मदतीने फाईल्स आणि फोल्डर लॉक करता येतात. विंडोज 10, विंडोज 8.1, विंडोज 8, विंडोज Vista आणि विंडोज XP मध्ये हे फीचर उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही दुसऱ्या युजर्सपासून तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. 3 / 7सर्वप्रथम आपल्या संगणकामध्ये तुम्हाला हवी असलेली म्हणजेच लॉक करायची असलेली फाईल सिलेक्ट करा. 4 / 7सिलेक्ट केलेल्या फाईलवर राइट क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अनेक पर्याय येतील त्यातील Properties हा पर्याय सिलेक्ट करा. 5 / 7यानंतर तुमच्या समोर एक नवीन पॉपअप विंडो ओपन होईल. त्यामध्ये General टॅबमध्ये देण्यात आलेल्या Advance वर क्लिक करा. 6 / 7एक नवीन विंडो ओपन होईल. Encrypt Contents to Secure Data हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून ओके बटणावर क्लिक करा. 7 / 7ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फोल्डर अथवा फाईल Encrypt होईल आणि तुमची फाईल लॉक होईल. त्यानंतर इतर युजर्स ती फाईल ओपन करू शकणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications