The Top 10 Most Powerful Android Phones According To Antutu
‘या’ छोट्याश्या कंपनीनं दिला शाओमीला धक्का देत मिळवला सर्वात वेगवान स्मार्टफोनचा मान By सिद्धेश जाधव | Published: May 13, 2022 6:54 PM1 / 10nubia Red Magic 7 स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोननं एप्रिल महिन्यात AnTuTu बेंचमार्किंगवर सर्वाधिक 10,38,771 पॉईंट्स मिळवले आहेत. हा फोन वेगवान Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट, 18GB RAM आणि 256GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. 2 / 10Redmi K50 Pro ची टॉप टेनमध्ये नव्यानं एंट्री झाली आहे. या फोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलनं टेस्टमध्ये 9,86,840 पॉईंट्स मिळवले आहेत. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर 6.67-इंचाचा 2K OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट देखील आहे. 3 / 10Xiaomi 12 Pro स्मार्टफोन मार्च महिन्यात पहिल्या स्थानावर होता. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. Xiaomi 12 Pro ला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC कडून पावर मिळते. हा फोन भारतात लाँच झाला आहे. 4 / 10Motorola Edge 30 Pro स्मार्टफोनला 9,77,395 पॉईंट्स मिळाले आहेत. टॉपला दोन नवीन डिवाइस आल्यामुळे ही घसरण झाली आहे. Motorola Edge 30 Pro हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला होता. फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन भारतात उपलब्ध आहे.5 / 10Realme’s GT 2 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या हा डिवाइस कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. 6 / 10iQOO 9 Pro देखील एप्रिलमध्ये टॉप 10 स्मार्टफोनमध्ये आला आहे. या डिवाइसला टेस्टमध्ये 9,54,336 पॉईंट्स मिळाले आहेत. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेटसह भारतात उपलब्ध आहे. तसेच यात 6.78-इंचाचा क्वॉड एचडी+ कर्व E5 LTPO AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. 7 / 10या यादीतील हा तिसरा शाओमी डिवाइस आहे. Xiaomi 12च्या 8GB/256GB व्हेरिएंटनं 9,48,391 पॉईंट्स मिळवले आहेत. या मोबाईलमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन लवकरच भारतात येऊ शकतो.8 / 10Samsung Galaxy S22 Ulta स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह भारतात आला आहे. गेल्या महिन्यात हा डिवाइस पाचव्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे यात Snapdragon 8 Gen1 चिपसेट, 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते. हा फोन 108MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. 9 / 10Samsung Galaxy S22 Ulta स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह भारतात आला आहे. गेल्या महिन्यात हा डिवाइस पाचव्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे यात Snapdragon 8 Gen1 चिपसेट, 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते. हा फोन 108MP कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. 10 / 10Galaxy S22 Plus मध्ये Galaxy S22 Ultra सारखेच फीचर्स आहेत परंतु यात छोटा डिस्प्ले आणि कमी बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डायनॅमिक अॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तसेच यातील 4,500mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. आणखी वाचा Subscribe to Notifications