शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये येणार नाही प्रॉब्लेम, या ५ टिप्स वाढवतील बॅटरीची लाईफ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 1:42 PM

1 / 6
जर तुम्हाला स्मार्टफोनची बॅटरी वारंवार चार्ज करावी लागत असेल तर या फोनमध्ये काही तरी समस्या असू शकते. तसेच तुम्ही या समस्येला स्मार्टफोनपासून दूर ठेवू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स देणार आहोत. त्या माध्यमातून तुम्ही बॅटरीची लाईफ वाढवू शकता.
2 / 6
जर तुम्ही बॅटरीला पूर्णपणे चार्ज करत नसाल आणि अर्ध्यावरच चार्जिंग बंद करून काम करायला सुरुवात करत असाल तर असे केल्याने बॅटरीची लाईफ कमी होऊ शकते.
3 / 6
जर तुम्ही बॅटरीला पूर्णपणे चार्ज करत नसाल आणि अर्ध्यावरच चार्जिंग बंद करून काम करायला सुरुवात करत असाल तर असे केल्याने बॅटरीची लाईफ कमी होऊ शकते.
4 / 6
तुमचा स्मार्टफोन आवश्यकतेपेक्षा अधिक गरम जागेवर ठेवू नका. कारण त्यामुळे तुमची बॅटरी फुलू लागेल. तसेच ती फुटण्याचाही धोका वाढेल.
5 / 6
स्मार्टफोनची बॅटरी चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजनल चार्जरचाच वापर करा. त्यामुळे बॅटरीवर दबाव येणार नाही.
6 / 6
तसेच कधीही बॅटरी चार्ज करत असताना त्यावर काम करू नका. विशेषकरून गेम खेळू नका. कारण त्यामुळे चार्जिंगवर परिणाम होतो. तसेच त्यामुळे बॅटरी खराब होण्याचा संभव असतो.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान