शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका मिनिटात इंटरनेटवर घडतं एवढं काही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 2:35 PM

1 / 8
आजच्या युगात इंटरनेट ही मुलभूत गरज बनली आहे. सोशल मीडियापासून ते इतर अत्यंत महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी इंटरनेट उपयुक्त ठरते. या वाढत्या अवाक्यामुळे इंटरनेटवर एका मिनिटात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असतात.
2 / 8
ई मेल - इंटरनेटवरून एका मिनिटामध्ये सुमारे 18 कोटी खासगी आणि औपचारिक मेल पाठवले जातात. त्यामध्ये जीमेलचा वाटा मोठा आहे, तर आऊटलूक, याहू यावरूनही मेलची मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण होते.
3 / 8
व्हॉट्सअॅप - व्हॉट्स अॅपवरून एका मिनिटाला सुमारे 4.1 कोटी मेसेज पाठवले जाता. विशेषत: नववर्षा दिवशी हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असते.
4 / 8
यूट्युब - सोशल मीडियावर यूट्युब मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून, यूट्युबरवर दर मिनिटाला सुमारे 45 लाख व्हिडिओ पाहिले जातात. तसेच गाणी ऐकण्यासाठीसुद्धा यूट्युबचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
5 / 8
गुगल - गुगल हे इंटरनेटवरील सर्वात मोठे आणि लोकप्रिय सर्च इंजिन बनले आहे. प्रत्येक मिनिटाला गुगलवर सुमारे 38 सर्च केले जातात. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्चिंग होऊनही गुगलचा सर्व्हर कधीही क्रॅश होत नाही.
6 / 8
फेसबूक - सोशल साईट्समध्ये फेसबूकची लोकप्रियता प्रचंड आहे. फेसबूकवर दर मिनिटाला सुमारे 10 लाख लोक लॉगइन होतात.
7 / 8
इन्स्टाग्राम - इन्स्टाग्रामवर दर मिनिटाला तीन लाख 47 हजार 222 फोटो अपलोड केले जातात.
8 / 8
ट्विटर - ट्विटरवरून दर मिनिटाला सुमारे 87 हजार 500 ट्विट केले जातात. ट्विटर हे एवढे लोकप्रिय झाले नाही. मात्र काही राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील ट्विट समाजाचे लक्ष वेधून घेत असतात.
टॅग्स :InternetइंटरनेटSocial Mediaसोशल मीडियाInternationalआंतरराष्ट्रीय