शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एका मिनिटात इंटरनेटवर घडतं बरंच काही, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:58 PM

1 / 10
एक मिनिटं म्हणजे 60 सेकंद. फक्त एका मिनिटात खूप काही होऊ शकतं. इंटरनेटवर एका मिनिटात तब्बल 18 कोटी ई-मेल पाठवले जातात. तर 10 लाख लोक 1 मिनिटात लॉग इन करतात. अशाच काही गोष्टी जाणून घेऊया.
2 / 10
इंटरनेटवर जगभरात एका मिनिटात तब्बल 18 कोटी 80 लाख ई-मेल पाठवले जातात.
3 / 10
जगभरात अवघ्या एका मिनिटात 4 कोटी 16 लाख मोबाईल मेसेज पाठवले जातात.
4 / 10
फेसबुक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. फेसबुकवर 10 लाख लोक 1 मिनिटात लॉग इन करतात.
5 / 10
यूट्यूबवर व्हिडीओ पाहणं युजर्सना आवडतं. एका मिनिटात 45 लाख व्हिडीओ पाहिले जातात.
6 / 10
गुगलवर सर्च केल्यास युजर्सना सर्व माहिती मिळते. गुगलवर फक्त एका मिनिटात 38 लाख सर्च क्वेरी येत असतात.
7 / 10
स्नॅपचॅटवर अनेक युजर्स व्हिडीओ बनवत असतात. जगभरात स्नॅपचॅटवर एका मिनिटात 21 लाख स्नॅप्स क्रिएट होतात.
8 / 10
टिंडर जगातील सर्वात लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप आहे. एका मिनिटात टिंडरमध्ये 14 लाख स्वाईप होतात.
9 / 10
अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करण्याला अधिक प्राधान्य देतात. जगभरात एका मिनिटात जवळपास 9,56,956 डॉलर खर्च केले जातात.
10 / 10
फक्त एका मिनिटात जगभरात 3,90,030 अ‍ॅप डाऊनलोड होतात.
टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञानFacebookफेसबुकYouTubeयु ट्यूबgoogleगुगलMobileमोबाइल