Things To Keep In Mind While Purchasing Charger For Your Smartphone
स्वस्त मिळतोय म्हणून कुठलाही चार्जर घेऊ नका; फोन ब्लास्ट टाळण्यासाठी ‘अशाप्रकारे’ निवड योग्य चार्जर By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 6:36 PM1 / 6चुकीचा चार्जर वापरल्यामुळे बॅटरीचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे फक्त फोन जात नाही तर युजर जखमी होण्याची देखील शक्यता असते. 2 / 6चार्जर फोनच्या बॅटरीपर्यंत वीज पोहोचवतो, हे तुम्हाला माहित असेल. प्रत्येक चार्जरचा स्पीड Watt मध्ये दर्शवला जातो. तो जेवढा जास्त तेवढ्या वेगाने बॅटरी चार्ज होते. वॉट क्षमता देखील वोल्ट आणि अॅम्पीयरवरून मोजली जाते.3 / 6जर तुमच्या चार्जरची रेटिंग 5V-3A असेल तर तुमचा चार्जर 15W चा आहे. नवीन चार्जर देखील तुम्ही अशाच रेटिंगसह घ्यावा. तसेच पुढे दिलेल्या गोष्टींची देखील काळजी घ्यावी. 4 / 6जर तुम्ही 20W चार्जिंग सपोर्ट असलेल्या फोनची बॅटरी 65W चार्जरनं चार्ज केली तर त्याचा चार्जिंग स्पीडवर कोणताही परिणाम होणार नाही. तुमची बॅटरी फक्त 20W चार्जिंग स्पीडनं चार्ज होईल, हे लक्षात असू द्या. चार्जर आणि बॅटरी दोन्ही एकाच स्पीडशी कम्पॅटिबल असावे. 5 / 6फोन सोबत मिळणार चार्जर सर्वात बेस्ट असतो. जर तुमच्या फोनच्या बॉक्समध्ये चार्जर मिळाला नसेल तर ज्याची शिफारस कंपनी करते, अशाच रेटिंगचा चार्जर घ्यावा. तसेच योग्य त्या ब्रँडची निवड करावी. 6 / 6फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा दुष्परिणाम म्हणजे बॅटरीचं तापमान वाढतं आणि बॅटरी लाईफ लवकर संपते. म्हणून अनेक कंपन्या स्मार्टफोनमध्ये दोन बॅटरी सेल देत आहेत. तुम्हाला फास्ट चार्जिंग हवी असेल तर अशा स्मार्टफोनची निवड करावी. आणखी वाचा Subscribe to Notifications