three red ticks on whatsapp know what is truth behind this viral message
WhatsApp वर तीन रेड टिक्सचा अर्थ काय? सरकार तुमच्यावर पाळत ठेवतंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 1:06 PM1 / 8नव्या डिजिटल नियमाबाबत व्हॉट्सअॅप (WhatsApp) सरकारच्या विरोधात कोर्टात गेला आहे. नवीन डिजिटल नियमांबाबत व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, हे मेसेजला ट्रेस करण्यासारखे आहे. यामुळे युजर्सच्या गोपनीयतेचे उल्लंघन होईल. यावर सरकारनेही त्वरित उत्तर दिले आहे. 2 / 8या सर्व घडामोडीत एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, आता सरकार तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकेल. 3 / 8व्हॉट्सअॅपवर एक फीचर आहे, ज्यामुळे जर रिसिव्हरने मेसेज वाचला असेल तर दोन निळ्या (ब्लू) टिक्स दिसतील. तसेच, याबाबत असे सांगितले जात आहे की, जर सरकारने तुमचा मेसेज वाचला तर तिसरी ब्लू टीक सुद्धा येईल.4 / 8व्हायरल होत असलेल्या या फेक मेसेजमध्ये असेही म्हटले जात आहे की, जर व्हॉट्सअॅप मेसेजेस पाठविण्याच्या तुमच्या मेसेजवर सरकारने कारवाई केली तर मेसेजसमोर दोन रेड (लाल) टिक्सही दिसतील. 5 / 8एवढेच नाही तर, असा दावा देखील केला जात आहे की, जर तुमच्या मेसेजवर तीन रेड टिक्स आल्या असतील तर याचा अर्थ असा की ही बाब कोर्टात पोहोचली आहे. चुकीचा मेसेज पाठविल्याबद्दल तुम्हाला कोर्टाकडून नोटीस पाठविली जाईल.6 / 8दरम्यान, हा फेक मेसेज आहे. या मेसेजच्या दाव्यांमध्ये कोणतेही सत्य नाही. सरकारकडून कोणतेही लाल किंवा तीन ब्लू टिक व्हाट्सअॅपवर येणार नाही. कोणतीही थर्ड पार्टी व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकत नाही.7 / 8याचच अर्थ सरकार तुमचे मेसेज वाचू शकत नाही. सर्व व्हॉट्सअॅप मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) असतात. मागील वर्षीही असाच एक मेसेज व्हायरल झाला होता. अशा मेसेजमुळे सामान्य व्हॉट्सअॅप युजर्सच्या मनात भीती निर्माण होते.8 / 8अशा परिस्थितीत असे मेसेज पाठविणाऱ्या रिपोर्ट करण्यात यावे. यासाठी, ज्याने तुम्हाला अशाप्रकारे फेक मेजेस पाठविला आहे, त्याचे चॅट किंवा ग्रुप उघडा. यानंतर प्रोफाइल इन्फोर्मेशनमध्ये जा. याठिकाणी तळाशी स्क्रोल केल्यावर, तुम्हाला Report contact किंवा Report group चा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करून रिपोर्ट करा. आणखी वाचा Subscribe to Notifications