शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TikTok चे नवे अ‍ॅप आले; गाणी ऐकताच नाही, गाताही येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:55 PM

1 / 12
भारतात टिकटॉक हे गेल्या दोन वर्षांत कमालीचे लोकप्रिय झालेले अॅप आहे. मात्र, या अ‍ॅपवर बंदी आणण्याचाही विचार सुरू आहे. असे असताना कंपनीने आणखी एक अ‍ॅप लाँच केले आहे.
2 / 12
टिकटॉकची एक पेरेंट कंपनी आहे. तिचे नाव बाईटडान्स आहे. ही कंपनी नवीन फिचरची अ‍ॅप वेळोवेळी लाँच करत असते. याच कंपनीने भारतात नवीन म्युझिक अ‍ॅप Resso लाँच केले आहे.
3 / 12
रेस्सो हे अ‍ॅप जियो म्युझिक, गाना, स्पॉटिफायला थेट टक्कर देणार आहे. बाईटडान्सने या अ‍ॅपला सोशल म्युझिक स्ट्रीमिंग अ‍ॅपचे नाव दिले आहे.
4 / 12
या अ‍ॅपमध्ये हे भन्नाट फिचर आहे, ते म्हणजे तुम्ही गाणी ऐकू शकता. पण त्याचबरोबर तुम्ही करेओकेसह गाणे गाऊही शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला अनेक गाण्यांचे म्युझिक ट्रॅक आणि लिरिक्स मिळतात.
5 / 12
या अ‍ॅपवर युजर्स त्यांचा कंटेंटही शेअर करू शकतात आणि कमेंटही करू शकतात. लिरिक्स म्युझिक सोबत तुम्हाला डिस्प्लेवर दिसणार आहे. याच्या मदतीने तुम्ही गाऊ शकणार आहात.
6 / 12
आतापर्यंत कोणत्याही म्युझिक अ‍ॅपवर लिरिक्स सुविधा नाहीय. यामुळे हे अ‍ॅप टिकटॉकसारखेच लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये जिम, रिलॅक्स सारखे एनेक मोडही देण्यात आले आहेत
7 / 12
Resso म्युझिक अ‍ॅपमध्ये कोणत्याही गाण्यावर केलेले कमेंट पब्लिक होणार आहे. म्हणजेच ते कोणीही पाहू शकणार आहे.
8 / 12
तसे पहाय़ला गेल्यास टिकटॉकचे व्हिडीओ बनविताना तुम्हाला त्यांचे म्युझिक घेता येते. मात्र, या अ‍ॅपमध्ये तुम्हाला केवळ म्युझिक मिळणार असून गाण्याचा आवाज तुमचाच असणार आहे. आहे की नाही भन्नाट कल्पना.
9 / 12
तसे पहाय़ला गेल्यास टिकटॉकचे व्हिडीओ बनविताना तुम्हाला त्यांचे म्युझिक घेता येते. मात्र, या अ‍ॅपमध्ये तुम्हाला केवळ म्युझिक मिळणार असून गाण्याचा आवाज तुमचाच असणार आहे. आहे की नाही भन्नाट कल्पना.
10 / 12
Resso अॅप फ्री आहे. पण काही सुविधांसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकता. अँड्रॉईड अ‍ॅपसाठी रेसो अॅपला 99 रुपये आणि आयफोनसाठी 199 रुपये महिना फी भरावी लागते.
11 / 12
पेड सर्व्हिस घेणाऱ्यांना म्युझिक डाऊनलोड करणे आणि हाय क्वालिटी ऑडिओ सारख्या सुविधा मिळणार आहेत.
12 / 12
या अ‍ॅपला आतापर्यंत पाच लाख जणांनी डाऊनलोड केले आहे.
टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकmusicसंगीत