शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Android Smartphone : अँड्रॉईड स्मार्टफोनचे हे 'सीक्रेट' कोड लक्षात ठेवा, खूप उपयोगी पडतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 5:13 PM

1 / 8
आजच्या काळात मोबाईल फोन जवळजवळ प्रत्येकाकडे आहेत आणि तेही स्मार्टफोन. तसे पाहिले तर स्मार्टफोन आज आपल्या सोबतीसारखा झाला आहे. आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांसोबतही राहत नाही, जितके आपण फोनसोबत राहतो आणि त्याची काळजी घेतो.
2 / 8
सध्या बाजारात विविध प्रकारचे स्मार्टफोन येत आहेत, ज्यात एकापेक्षा एक फीचर्स पाहायला मिळतात. जेव्हा तुमच्यापैकी बरेच जण स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा साहजिकच तुम्ही फोनमध्ये नवीन आणि उत्तम फीचर्स आहेत की नाही, हे आधी पाहता, त्यानंतरच तुम्हाला हवा तसा फोन खरेदी करता.
3 / 8
परंतु जर तुमच्याकडे आधीपासूनच अँड्रॉईड स्मार्टफोन असेल, तर तुम्ही ते वर्षानुवर्षे वापरत असलात तरी तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती नसते. तर आम्ही तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनच्या काही 'सीक्रेट' कोडबद्दल सांगू, जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
4 / 8
*#*#4636#*#*हा एक सीक्रेट कोड आहे, ज्याद्वारे आपण आपल्या फोनबद्दल संपूर्ण माहिती मिळवू शकता. मोबाईल डिटेल्स, नंबर, IMEI नंबर, वाय-फायसंदर्भातील माहिती तुन्ही हा कोड डायल करून मिळवू शकता.
5 / 8
तुम्ही *2767 *3855# कोड डायल करून तुमचा फोन रीसेट करू शकता. रीसेट केल्यानंतर, तुमच्या फोनची मेमरी डिलीट होईल. त्यामुळे जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच हा कोड वापरा, अन्यथा तुम्ही तुमचा फोन डेटा गमावू शकता.
6 / 8
*# 21# कोडच्या मदतीने तुम्ही तुमचे कॉल, मेसेज किंवा इतर कोणताही डेटा इतरत्र वळवला गेला आहे की नाही हे जाणून घेऊ शकता.
7 / 8
तुम्ही तुमच्या फोनचा IMEI नंबर जाणून घेण्यासाठी *# 06# कोड वापरू शकता. जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तर IMEI क्रमांकाच्या मदतीने पोलीस त्याचा मागोवा घेऊ शकतात.
8 / 8
*# 62# कोडच्या मदतीने तुम्ही तुमचे कॉल, मेसेज इत्यादी इतर कोणत्याही नंबरवर पुनर्निर्देशित केले गेले आहेत की नाही हे जाणून घेऊ शकता.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडMobileमोबाइल