tip to speed up 4g internet speed in your smartphone
फोनमध्ये 4G इंटरनेट स्पीड होणार चौपट; 'या' टिप्स करा फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 4:24 PM1 / 5स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जात असून तो प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झाला आहे. आता सर्वच स्मार्टफोन हे 4G सपोर्टसह येतात. तसेच फोनमध्ये 4G VoLTE देण्यात आलेले असते. मात्र अनेकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे इंटरनेटचा नीट वापर करता येत नाही. त्यामुळे फोनमध्ये 4G इंटरनेट स्पीड कसा वाढवायचा हे जाणून घेऊया. 2 / 5तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा स्पीड स्लो असेल तर सर्वप्रथम फोनच्या सेटींगमध्ये जा. 3 / 5फोनच्या सेटींगमध्ये गेल्यावर नेटवर्क सेटींगचा एक पर्याय मिळेल. त्यामध्ये गेल्यावर preferred type of network हे 4G किंवा LTE को सिलेक्ट करा. 4 / 5याशिवाय नेटवर्क सेटींगमध्ये जाऊन Access Point Network (APN) ची सेटिंग चेक करा. त्यामध्ये कोणतं APN सिलेक्ट केलं आहे हे चेक करा. स्पीडसाठी योग्य APN असणं गरजेचं आहे. जर योग्य APN निवडला नसेल तर APN ऑप्शनवर जाऊन सेटींग करा. 5 / 5स्मार्टफोनमध्ये असलेले सोशल मीडिया फोनच्या इंटरनेटचा स्पीड कमी करतं. तसेच यामुळे जास्तीचा डेटाही खर्च होतो. यापासून वाचण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन ऑटो प्ले व्हिडीओ बंद करा. तसेच फोनचं ब्राऊजर डेटा सेव्ह मोडमध्ये सेट करा. आणखी वाचा Subscribe to Notifications