Tips buy second hand smartphone in best condition
सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 6:05 PM1 / 6जर तुम्ही जुना स्मार्टफोन म्हणजे कि सेकंड हँड स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत आहात का? वापरलेला स्मार्टफोन विकत घेताना बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पुढे आम्ही त्यांची माहिती दिली आहे. 2 / 6फोन मालकाने विकत घेतला आहे कि नाही हे बिल वरून समजू शकतं. एखादा फोन चोरीचा देखील असू शकतो. त्यामुळे सेकंड हँड फोन विकत घेताना त्याचं बिल जरूर मागा. 3 / 6फोनच्या बिल सोबतच त्याचा बॉक्स आणि चार्जर आणि इयरफोन्स अशा अॅक्सेसरीज देखील जुन्या मालकाकडून घेण्यास विसरू नका. ओरिजनल चार्जर असल्यास तुमच्या फोनच्या बॅटरीचं आयुष्य वाढू शकतं. 4 / 6फोन विकत घेण्याआधी स्पिकर आणि चार्जिंग पोर्ट बघून घ्या. तसेच चारही कॉर्नरवरील डॅमेज चेक करा. विशेष म्हणजे फोनचा कव्हर काढून फोन कोणत्या अवस्थेत आहे ते बघा. डॅमेज लपवण्यासाठी फोन कव्हरचा वापर केला जाऊ शकतो. 5 / 6जुन्या फोनवर डुप्लीकेट स्क्रीन लावून तो विकण्याचा प्रकार केला जातो. डिस्प्लेचा टच चेक करा. जमल्यास एखाद्या स्मार्टफोन रिपेयर करणाऱ्या व्यक्तीकडून टच टेस्ट करून घ्या. 6 / 6कॅमेऱ्यातून वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये फोटो काढून बघा. कॅमेरा लेन्स सुस्थितीत आहे कि नाही ते चेक करा. घाई गडबडीत सेल्फी कॅमेरा चेक करायला विसरू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications