शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेससाठी टॉप-5 ब्रॉडबँड प्लॅन्स; कमी किमतीत जास्त स्पीड आणि OTT बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 11:30 AM

1 / 7
नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मोठ्या कंपन्या, शाळा आणि महाविद्यालये घरून अभ्यास आणि काम करण्यास सांगत आहेत, त्यामुळे इंटरनेट ब्रॉडबँडची मागणी वेगाने वाढली आहे.
2 / 7
जिओ, बीएसएनएल आणि एअरटेलकडे अनेक कमी किमतीचे प्लॅन आहेत, जे जास्त इंटरनेट स्पीड देतात आणि OTT फायदे देखील त्यासोबत उपलब्ध आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच 5 प्‍लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्‍याचा वापर घरातून काम करण्‍यासाठी आणि ऑनलाइन स्‍टडी करणारे लोक करू शकतात.
3 / 7
बीएसएनएलच्या 399 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 200GB डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये यूजरला 10mbps चा स्पीड मिळतो. डेटा संपल्यानंतर, डेटाचा वेग 2mbps पर्यंत कमी होतो. यासोबत मोफत लँडलाइन कनेक्शन उपलब्ध आहे, ज्याद्वारे अनलिमिटेड कॉलिंग करता येते.
4 / 7
एअरटेलचा हा एंट्री लेव्हल प्लॅन आहे, 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 40Mbps च्या स्पीडसह 3.3TB पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि शॉ अकादमीचे सब्सक्रिप्शन तसेच एअरटेल थँक्स बेनिफिट्सचाही समावेश आहे.
5 / 7
रिलायन्स जिओच्या 399 रुपयांचा प्लॅनमध्ये 30mbps स्पीड आणि अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये कोणतेही OTT बेनिफिट्स नाहीत. मात्र जिओ कमी किमतीत अनलिमिटेड डेटा देत आहे.
6 / 7
जिओचा 699 रुपयांचा प्लॅन अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगसह 100Mbps स्पीड ऑफर करतो. या प्लॅनमध्ये OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध नाही. परंतु ज्यांना जास्त स्पीड हवा आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे.
7 / 7
जिओच्या 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळतो, त्यासोबत तुम्हाला मोफत कॉलिंग देखील मिळते. प्लॅनमध्ये 16 अॅप्सची फ्री सब्सक्रिप्शन उपलब्ध आहे, ज्यामध्ये Amazon Prime, Disney Plus Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Alt Balaji यांचा समावेश आहे.
टॅग्स :businessव्यवसायInternetइंटरनेटJioजिओBSNLबीएसएनएल