शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 7:28 PM

1 / 7
TRAI : जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता तुम्हाला मोबाईल फोनमध्ये दोन सिम कार्ड ठेवण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकतात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI सिम कार्ड नियमांमध्ये काही बदल करू शकते.
2 / 7
ट्राय लवकरच सिम कार्डचे नियम बदलू शकते. जर तुम्ही फोनमध्ये दोन सिमकार्ड अनावश्यकपणे वापरत असाल तर त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क घेतले जाऊ शकतात. म्हणजेच जर तुम्ही एकच सिम वापरत असाल पण फोनमध्ये दोन सिम बसवले असतील तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागतील. ग्राहकांकडून हे शुल्क मासिक किंवा वार्षिक असू शकते.
3 / 7
मोबाइल ऑपरेटर्सकडून मोबाइल फोन आणि लँडलाइनसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यासाठी ट्रायकडून एक योजना तयार करण्यात येणार आहे. ती योजना सुरू झाल्यास मोबाईल ऑपरेटर ग्राहकांकडून त्याची भरपाई करू शकतात. जर तुम्ही तुमचे एक सिम कार्ड बंद ठेवल्यास, तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकतात.
4 / 7
मोबाइल ऑपरेटर अशा वापरकर्त्यांचे नंबर ब्लॉक करत नाहीत ज्यांनी त्यांचे सिम कार्ड बऱ्याच काळापासून सक्रिय केले नाही. मोबाईल ऑपरेटर्सनी मोबाईल नंबर बंद करून त्यांचा यूजर बेस कमी करू नये.
5 / 7
तर सिमकार्ड बराच काळ वापरत नसेल तर ते काळ्या यादीत टाकून बंद करावे, असा नियम आहे. अशा परिस्थितीत ट्रायकडून मोबाईल ऑपरेटरवर दंड आकारला जाऊ शकतो.
6 / 7
रिपोर्टनुसार, सध्या मोबाईल नंबरची खूप समस्या आहे. बहुतेक वापरकर्ते त्यांच्या फोनमध्ये दोन सिम वापरतात पण बहुतेकजण फक्त एकच सिम सुरू ठेवतात. तर दुसरे सिम अधूनमधून वापरले जाते. अशा स्थितीत मोबाइल क्रमांकांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याची योजना तयार केली जाऊ शकते.
7 / 7
ट्रायच्या आकडेवारीनुसार, सध्या २१९ मिलियनहून अधिक मोबाइल नंबर बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत. हे सर्व मोबाईल क्रमांक काळ्या यादीत टाकण्यात आले आहेत. एकूण मोबाईल नंबरपैकी हे १९ टक्के आहे जी एक गंभीर समस्या आहे.
टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइल