truecaller launches guardians app for personal safety know all details
Truecaller ने लॉन्च केले नवीन अॅप; आता व्यक्तीलाही ट्रॅक करता येणार By देवेश फडके | Published: March 04, 2021 3:58 PM1 / 10आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाइल अधिक स्मार्ट होत चालले आहेत. स्मार्टफोन्समुळे घरबसल्या इंटरनेटच्या मदतीने अनेकविध कामे आपल्याला करता येऊ शकतात. मात्र, यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. 2 / 10एखाद्या नंबरवरून आपल्याला फोन आल्यास, त्याविषयीची माहिती देणारे काही अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्यात Truecaller सर्वांत आघाडीवर आणि लोकप्रिय आहे. Truecaller मुळे कॉलरबाबतची माहिती आपल्याला मिळते. याच ट्रूकॉलरने युझर्ससाठी खास भेट आणली आहे. (truecaller launches guardians app)3 / 10स्वीडनची कंपनी असलेल्या Truecaller ने आता नवीन अॅप लॉन्च केले आहे. या नवीन अॅपचे नाव Guardians असे ठेवण्यात आले आहे. हे अॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेषतः महिला सुरक्षेसाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 4 / 10स्वीडन आणि भारतातील टीमने १५ महिन्यांच्या कालावधीत संयुक्तपणे हे अॅप डेव्हलप केल्याचे Truecaller कडून सांगण्यात आले आहे. अन्य अॅपपेक्षा Guardians वेगळे आहे, असे ट्रूकॉलरचे सहसंस्थापक आणि सीईओ Alan Mamedi यांनी म्हटले आहे. 5 / 10Guardians अॅपद्वारे तुम्ही Always Share लोकेशन सिलेक्ट करून आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नेहमी लोकेशन शेअर करु शकतात. एखाद्या ठिकाणी जाताना लोकेशन शेअर करण्याचा पर्यायही यामध्ये आहे. 6 / 10यासह Guardians अॅपमध्ये आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय कंपनी येत्या काळात आपात्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरिंगऐवजी स्थानिक प्रशासनाला सूचना देण्याच्या पर्यायावररही काम करणार आहे.7 / 10लोकेशन शेअरिंगसोबतच मोबाइल बॅटरी आणि नेटवर्क स्टेटसची माहिती Guardians च्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला मिळू शकते. याशिवाय तुमचा मोबाइल फोन किती वेळ सुरू राहू शकेल, यासंदर्भातही माहिती मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. 8 / 10 ट्रू-कॉलर युजर्सना त्याच आयडीद्वारे Guardians अॅपमध्ये लॉग-इन करता येऊ शकते. मात्र, अन्य युझर्सना मोबाइल नंबरद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण करून लॉग-इन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मिस्ड कॉल देऊन ओटीपी मिळवता येऊ शकतो. 9 / 10Guardians अॅपचा वापर करण्यासाठी लोकेशन, कॉन्टॅक्ट्स आणि फोन यांची परवानगी द्यावी लागणार आहे. या अॅपचा युजर इंटरफेस वापरण्यास सुलभ असून, आपले लोकेशन शेअर करण्यावर मर्यादा नाहीत. आपण आपले लोकेशन कितीही जणांसोबत शेअर करू शकतो. 10 / 10 Guardians अॅपमध्ये लोकेशन शेअरिंग बंद करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अॅपमुळे बॅटरी अधिक प्रमाणात उतरत नाही. हे अॅप बॅकग्राउंडला काम करत असल्यामुळे बॅटरीची बचत होते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications