शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Twitter ची मोठी घोषणा; जर तुमच्याजवळ फॉलोअर्स असतील तर तुम्हीही दरमहा कमवू शकता पैसे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 1:54 PM

1 / 10
नवी दिल्ली : जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरत असाल आणि तुमचे फॉलोअर्स अधिक असतील तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
2 / 10
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर आता Instagram), यूट्यूबप्रमाणेच (YouTube) युजर्सला पैसे मिळवण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भात कंपनीने आज आपल्या यजुर्संसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
3 / 10
ट्विटरने दोन नवीन फिचरची घोषणा केली आहे. या नवीन फीचरमुळे कंपनी आता युजर्संना कमविण्याची संधीही देणार आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, आता युजर्संना आपल्या फॉलोअर्सला अतिरिक्त कंटेंट दाखवण्याची, ग्रुप आधारित स्पेशनल कंटेंट तयार करण्याची आणि ग्रुपमध्ये सामील होण्याची सुविधा असणार आहे.
4 / 10
आंतरराष्ट्रीय वेबसाइट ‘The Verge’ च्या मते, यामध्ये एक सुपर फॉलो पेमेंट फिचर असेल. ज्यात युजर्स आपल्या फॉलोअर्सला अधिक कंटेंटपर्यंत पोहोचण्यासाठी पैसे घेऊ शकतील. यामध्ये बोनस ट्विट्स, कम्युनिटी ग्रुपपर्यंत पोहोचणे, न्यूजलेटरची सदस्यता यांचा समावेश आहे.
5 / 10
ट्विटरने स्क्रीनशॉटद्वारे दाखविले आहे की, ट्विटर युजर्सला दरमहा 4.99 डॉलर कमवू शकतात. ट्विटरला आपल्या युजर्सला त्यांच्या चाहत्यांद्वारे कमाईचे साधन उपलब्ध करुन द्यायचे आहे. मात्र, या सुविधा केव्हा सुरू होतील, याबद्दल काही सांगण्यात आले नाही.
6 / 10
दरम्यान, सध्या युजर्संसाठी डायरेक्ट पेमेंट टूल खूप महत्वाचे आहे. पॅट्रियन देखील खूप यशस्वी झाले आहे. फेसबुकपासून ते यूट्यूब आणि गिट हबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अशी पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे.
7 / 10
आता ट्विटरही यात आपला भाग घेणार आहे. मात्र, याबद्दल फारसे काही समोर आले नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या सबस्क्रिप्शन फीचरमुळे कंपनीच्या रकमेतही वाढ होईल.
8 / 10
ट्विटरने आपल्या नवीन फीचरचे नाव 'कम्युनिटी' ठेवले आहे. हे फेसबुक ग्रुपसारखेच असेल. यामध्ये युजर्स त्यांच्या मनानुसार ग्रुप तयार करू शकतात आणि त्यात सामील होऊ शकतील. ट्विटर त्यांना त्यांच्या पसंतीनुसार विषयांवरील अनेक ट्विट दाखवेल.
9 / 10
अलीकडेच ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से (Jack Dorsey)यांच्या क्रेडिट आणि पेमेंट्स फर्म स्क्वेअर (स्क्वेअर) ने बिटकॉइनमध्ये (Bitcoin) 17 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
10 / 10
हे क्रिप्टोकरन्सीमध्ये याआधीच्या गुंतवणुकीपेक्षा 3 पट जास्त आहे. कंपनीने आपल्या तिमाही उत्पन्नाच्या अहवालात म्हटले आहे की, 51,236 च्या सरासरी किंमतीवर जवळपास 3,318 बिटकॉइन खरेदी केले आहे.
टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडियाbusinessव्यवसाय