"कर्मचाऱ्यांनी इच्छा असेल तर ऑफिसला यावे अन्यथा कायम घरातून काम करावे" By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 11:15 AM1 / 9जगभरात कोरोना व्हायरचा हाहाकार माजला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे बहुतांश कंपन्या बंद आहेत. तर अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे वर्क फॉर्म होम सुरु आहे. 2 / 9सोशल मीडियात अग्रेसर असणाऱ्या ट्विटर कंपनीनेही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आधीच आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. 3 / 9एका रिपोर्टनुसार, आता ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी आपल्या कर्मचार्यांना म्हटले आहे की, 'जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत कर्मचारी घरातूनच काम करू शकतात.'4 / 9Verge च्या एका रिपोर्टनुसार, ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'जर आमचे कर्मचारी सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अडकले आहेत. त्यामुळे कर्मचारी नेहमीच घरून काम करत असतील तर ते करू शकतील.'5 / 9ट्विटरने असेही म्हटले आहे की, जर कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करायचे असेल तर हा देखील त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. कर्मचारी अॅडिशन प्रिकॉशन घेऊन ऑफिसमध्ये येऊ शकतात.6 / 9कर्मचारी ऑफिसमध्ये ज्यावेळी येतील, त्यावेळी ऑफिस ओपन करण्यात येईल. म्हणजेच कंपनीने ऑफिस ओपन करण्याचा निर्णय कमर्चाऱ्यांवर सोडला आहे. 7 / 9कंपनीच्या म्हणण्यानुसार, काही अपवाद वगळता सप्टेंबर महिन्यापूर्वी ऑफिस ओपन होणार नाहीत. ऑफिस ओपन केल्यानंतरही पहिल्यासारखी परिस्थिती नाही आणि लोकांना आता सावधगिरी बाळगावी लागेल.8 / 92020 मध्ये कोणताही फिजिकल इव्हेंट होणार नाही. सप्टेंबरपर्यंत काही अपवाद वगळता कंपनीने आपल्या कर्मचार्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावरही बंदी घातली आहे, असे ट्विटरने म्हटले आहे. 9 / 9दरम्यान, ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्वाधिक देणगी दिली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या एकूण संपत्तीपैकी २५ टक्के देगणी जॅक डोर्सी यांनी देण्याची घोषणा केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications