Unisoc 9863a SOC Is Dangerous For Users Reports Kryptowire
‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सना हॅकिंगची भीती; नोकिया, सॅमसंग आणि रियलमीच्या मोबाईल्सचा समावेश, पाहा यादी By सिद्धेश जाधव | Published: March 21, 2022 7:00 PM1 / 6Kryptowire च्या एका रिपोर्टनुसार, अनेक लोकप्रिय स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या UNISOC SC9863A प्रोसेसरमध्ये मोठा दोष समोर आला आहे. या त्रुटीमुळे युजरच्या अडचणीत वाढ होऊ शकते. 2 / 6रिपोर्टनुसार, UNISOC SC9863A चिपसेटसह येणाऱ्या एका अॅपच्या माध्यमातून हॅकर स्मार्टफोनचा संपूर्ण अॅक्सेस मिळवू शकतात. अॅक्सेस मिळाल्यावर डेटा चोरी, डेटा वाईप (डिलीट), फ्रंट कॅमेरा आणि माईक देखील अॅक्सेस करता येईल. 3 / 6या त्रुटीचा वापर करून हॅकर कॉल रेकॉर्ड, टेक्स्ट मेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि इतर खाजगी डेटा मिळवू शकतो. तसेच जगातील कोणत्याही युजरच्या फोनचा फ्रंट कॅमेरा ऑन करून हॅकर व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतो. 4 / 6UNISOC SC 9863A प्रोसेसर अनेक बजेट स्मार्टफोन्समध्ये देण्यात आला आहे. 5 / 6यात Realme C11, Samsung Galaxy A03 Core, Nokia C01 Plus, Nokia C20 Plus, Nokia C30, Gionee Max, Gionee Max Pro, itel A49, Lava Be U आणि Tecno Pop 5 LTE सारख्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. 6 / 6यातील नोकिया युजर्सना दिलासा देणारी बातमी आहे. कंपनीनं हा दोष अपडेट देऊन दूर केला आहे. आणि इतर कंपन्या देखील नोकियाप्रमाणे योग्य ती पाऊलं उचलतील अशी अपेक्षा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications