शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

200 रुपयांमध्ये स्मार्टफोनला बनवा सुपरस्मार्ट; प्रत्येक प्रॉब्लमवर सॉल्यूशन आहेत ‘या’ 5 अ‍ॅक्सेसरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 4:59 PM

1 / 6
मोबाईल युजर्सची अनेक कामं अ‍ॅक्सेसरीजमुळे सोपी होतात. अशा काही अ‍ॅक्सेसरीज आहेत ज्या 200 रुपयांच्या आत ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वर मिळत आहेत. पुढे आम्ही यांची यादी दिली आहे.
2 / 6
हा भन्नाट बॉक्स आहे जो तुम्हाला तुमची चार्जिंग केबल ठेवण्यास मदत करेल. यामुळे केबल सुरक्षित राहते, तसेच गुंतत नाही. याची किंमत 138 रुपये आहे.
3 / 6
ही एक चार्जिंग केबल आहे जी टाईप सी आणि जुन्या मायक्रो यूएसबी डिवाइस सोबत वापरता येते. हिची किंमत 199 रुपये आहे.
4 / 6
सध्या स्मार्टफोन कंपन्या 3.5mm ऑडियो जॅक स्मार्टफोनमध्ये देणं टाळत आहेत. परंतु जी म्युजिक क्वॉलिटी वायर्ड हेडफोन्स देतात ती ब्लूटूथ हेडफोन्समध्ये मिळत नाही. त्यामुळे जर तुम्ही देखील एक टाईप सी टू हेडफोन जॅक शोधत असाल तर 199 रुपयांमध्ये मिळणारा हा कनेक्टर घेऊ शकता.
5 / 6
कारमध्ये चार्जर असणं खूप आवश्यक आहे. या मोबाईल, टॅबेलेट्सशी कम्पॅटिबल असलेल्या चार्जरची किंमत 111 रुपये आहे. याच्या मदतीनं एकावेळी दोन डिवाइस चार्ज करता येतात.
6 / 6
या चार्जींग स्टॅन्डचा वापर ज्या प्लग जवळ स्मार्टफोन ठेवण्यासाठी जागा नाही अशा ठिकाणी करता येईल. याची किंमत 69 रुपये आहे. फक्त स्मार्टफोन नव्हे तर अन्य डिवाइस चार्ज करताना देखील याचा वापर करता येईल.