शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुन्या स्मार्टफोनला असा बनवा घरचा 'सिक्युरिटी कॅमेरा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 2:13 PM

1 / 8
स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र फोन जुना झाल्यावर नवीन स्मार्टफोन घेतला जातो. जुन्या फोनचा देखील काही कामाकरता चांगला वापर करता येतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. 
2 / 8
'सिक्युरिटी कॅमेरा' सध्या अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अनेकदा तो महाग असल्याने विकत घेतला जात नाही. जुन्या स्मार्टफोनला 'सिक्युरिटी कॅमेरा' करता येतं. कसं ते जाणून घेऊया.  
3 / 8
जुन्या अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोनला घरी सिक्युरिटी कॅमेरा वाय-फाय किंवा कमीत कमी 4G कनेक्शनची गरज आहे. तसेच फोनचं चार्जिंग लवकर संपू नये, म्हणून पॉवर बँकेचीही आवश्यकता आहे. 
4 / 8
युजर्सच्या सुरक्षिततेचा विचार करता गुगल अकाऊंटचा वापर न करण्याचा सल्ला आहे.  जुन्या स्मार्टफोनची फॅक्ट्री रिसेट करावा लागणार आहे. तसेच गुगल प्ले-स्टोरवर जाऊन अल्फ्रेड कॅमेरा अ‍ॅप उपलब्ध आहे. हा अ‍ॅप इन्स्टॉल आणि रजिस्टर करावा लागेल. 
5 / 8
अ‍ॅप सेटअप करताना 'i use this device as' हा प्रश्न आल्यावर कॅमेरा हा पर्याय निवडा. त्यानंतर गुगल अकाऊंटच्या मदतीने लॉग-इन करावे लागेल. 
6 / 8
आपल्या पर्यायी अकाउंटवर लॉग-इन केल्यानंतर आपला स्मार्टफोन हा सिक्युरिटी कॅमेरावर लाइव्ह स्ट्रीमिंगची सुरुवात होईल.
7 / 8
दुसऱ्या एका स्मार्टफोनवर अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल. हा अ‍ॅप सेटअप करताना 'i use this device as' हा प्रश्न आल्यावर, 'Viewer' हा पर्याय निवडा आणि त्याच गुगल अकाऊंटवरुन लॉग-इन करा. त्यानंतर तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या कॅमराची लाइव्ह फीड पाहू शकता. 
8 / 8
अ‍ॅप्सचा वापर करण्यासाठी त्याचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. alfred.computer साईटवर जाऊन गुगल अकाऊंटच्या मदतीने साइन-इन करा. 
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड