शाओमीची गॅजेटस् वापरताय? खरी आहेत की बनावट? असे तपासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 23:53 IST
1 / 7चीनची स्मार्टफोन कंपनीने भारतात कमी काळात चांगलाच जम बसविला आहे. स्मार्टफोनसोबत टीव्ही, वॉच, पॉवर बँक अशा अनेक प्रकारची उत्पादनेही या कंपनीने विकण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये स्पोर्ट शूजही आहेत. पण आता या उत्पादनांची बनावटही करण्यात येत आहे. शाओमीनेच ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे. 2 / 7शाओमीची उत्पादने खरेदी करताना ती खरी आहेत की खोटी हे तपासावे. फिटनेससाठीची उत्पादने Mi Fit अॅपसोबत काम करतात. तसेच अन्य स्मार्ट डिव्हाईसही कंपनीने दिलेल्या अॅपवर चालतात. बनावट गॅजेटना या अॅपचा सपोर्ट मिळत नाही. 3 / 7शाओमीची पॉवर बँक खरेदी करताना सिक्युरिटी कोड जरूर तपासावा. सिक्युरिटी कोड mi.com वर टाकून खरे-खोटेपणा तपासता येतो. 4 / 7ओरिजिनल बॅटरीवर Li-Poly चा उल्लेख असतो. तर बनावट बॅटरीवर Li-ion लिहिलेले असते. 5 / 7शाओमीने सांगितले की कंपनीचा लोगोही तपासावा. बनावट उत्पादनांवरील लोगो खऱ्या लोगोपेक्षा वेगळा असतो. 6 / 7कोणतेही उत्पादन खरेदी करतेवेळी त्याचा बॉक्स वेबसाईटवर जाऊन तसाच दिसतो का हे पहावे. जर वेगळा असेल तर ते उत्पादन करेदी करू नये. 7 / 7बनावट युएसबी केबल आणि अॅक्सेसरी दिसण्यास खराब असतात. तसेच क्वालिटीही खराब असते. ओरिजिनल उत्पादनांमध्ये चांगला दर्जा असतो.