शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता थेट Paytm वरून करता येणार Vaccine Slot बुक; असा करा नव्या फीचरचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 2:21 PM

1 / 10
Covid 19 Vaccine Slots : डिजिटल पेमेंट अॅप Paytm युझर्सना आता कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे स्लॉट मिळवणं आता अधिक सोपं झालं आहे.
2 / 10
आता युझर्स पेटीएमद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी स्लॉट (Vaccine Slot booking)बुक करू शकतात. सोमवारी कंपनीनं या नव्या फीचरची घोषणा केली.
3 / 10
गेल्या महिन्यात Paytm नं लसीकरण केंद्रासाठी लोकेटर (vaccine center locator) टूल सुरू केलं होतं.
4 / 10
ज्या नागरिकांना कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनचे स्लॉट हवे असतील ते पेटीएमद्वारे नवे सेंटर्स शोधू शकतात आणि जर स्लॉट उपलब्ध असतील तर ते त्यांना बुकही करता येतील. नियमानुसार ज्यांना लस घेण्याची परवानगी आहे त्यांनाच या सुविधेचा वापर करता येईल.
5 / 10
सर्वप्रथम पेटीएम अॅप ओपन करा. जर तुमचं पेटीएम लॉगिन नसेल तर लॉग इन करा. अन्यथा तुमचा नवा अकाऊंट क्रिएट करा.
6 / 10
त्यानंतर थोडं खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला Feature सेक्शनमध्ये Vaccine Finder चा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवं पेज सुरू होईल. त्या ठिताणी तुम्ही तुमचा पिन कोड किंवा जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या नजीक असलेली केंद्रे दिसतील.
7 / 10
यानंतर तुम्हाला तुमचा Age Group आणि Dose सिलेक्ट करावा लागेल. उदाहरण घ्यायचं झाल्यास तुमचा पिन कोड १२३४५६ आणि वयोगट १८-४४ असा सिलेक्ट करा आणि डोस सिलेक्ट करा.
8 / 10
त्यानंतर Check Availability या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक सिलेक्ट करा जो तुम्ही Co-Win अॅपसाठी वापरू इच्छित आहात.
9 / 10
यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून त्या ठिकाणी असलेल्या डन या ऑप्शनवर क्लिक करा.
10 / 10
यानंतर जर स्लॉट उपलब्ध असेल त्या प्रमाणे तुम्हाला स्लॉट आणि वेळ निवडता येईल. त्यानंतर टाईम स्लॉटमध्ये ज्या व्यक्तीला लस घ्यायची असेल त्याचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर Schedule Now वर क्लिक करा.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPaytmपे-टीएमIndiaभारत