शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिग्गज ब्रँड OnePlus झाला Oppo मध्ये मर्ज; पाहा ग्राहकांवर काय होणार याचा परिणाम?, जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 1:38 PM

1 / 10
OnePlus Oppo Merger: स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज आणि आपल्या प्रीमिअम फोनसाठी ओळखली जाणारी कंपनी OnePlus ही अधिकृतरित्या आता ओप्पोसोबत मर्ज होणार आहे.
2 / 10
ओप्पोसोबत इंटिग्रेशनमुळे वनप्लसला अधिक चांगले प्रोडक्ट विकसित करणं आणि सध्या असलेल्या प्रोडक्ट्समध्ये अधिक वेगवान आणि स्थित सॉफ्टवेअर अपडेट आणण्यास मदत मिळणार आहे.
3 / 10
कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी Pete Lau यांनी बुधवारी मर्जरबाबत माहिती दिली.
4 / 10
दोन्ही कंपन्यांचं स्वामित्व हे BBK इलेक्ट्रॉनिक्सकडे आहे. ओप्पो आणि विवो या दोन्ही कंपन्.ा गेल्या वर्षभरापासून काही स्तरावर एकत्र काम करत आहेत.
5 / 10
Pete Lau हे वनप्लस आणि ओप्पो या दोन्हींसाठी प्रोडक्ट स्ट्रॅटजी पाहत आहेत. यापूर्वी करण्यात आलेल्या बदलांचा काही सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी आतापर्यंत भविष्यातील रोडमॅपबाबत अधिक चर्चा केली नाही.
6 / 10
वनप्लस हा ब्रान्ड स्वतंत्र ब्रान्ड म्हणून काम पाहणार आहे. तसंच वनप्लस प्रोडक्ट लाँच, इव्हेंट आणि फीडबॅकसाठी ग्राहकांसोबोत पहिल्याप्रमाणेच ग्राहकांसोबत वनप्लस चॅनल्सद्वारे संवाद साधत राहणार आहे. याद्वारे नव्या ग्राहकांना सोबत जोडणं हा उद्देश असल्याचंही Lau यांनी सांगितलं.
7 / 10
वनप्लस भविष्यातील एका नव्या वळणारवर आहे. कंपनीनं आपल्या प्रोडक्ट पोर्टफोलिओ विकसित करण्याला सुरूवात केली आहे. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पर्याय मिळतील, असंही त्यांनी नमूद केलं.
8 / 10
ग्राहकांना अधिक क्वालिटी असलेला वनप्लस अनुभव देणं जारी ठेवू इच्छित असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, ते करण्यासाठी त्यांना टीम आणि ब्रान्ड म्हणून त्याप्रमाणे बनावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
9 / 10
दोन्ही ब्रान्डचं झालेल्या मर्जरमुळे हैराण होण्याची बाब नाही. वनप्लसनं चीनमध्ये वनप्लस 9 सीरिजला ओप्पोच्या कलर ओएस सॉफ्टवेअरसह लाँच केलं होतं.
10 / 10
यापूर्वी चीनमध्ये विक्री होत असलेले सर्व वनप्लस फोन हे हायड्रोजन ओएस बेस्ड होते.
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलoppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनbusinessव्यवसायchinaचीन