video calls can also be made from WhatsApp Web
लयभारी! WhatsApp Web वरुनही व्हिडिओ कॉल करता येणार By मोरेश्वर येरम | Published: December 17, 2020 1:47 PM1 / 8व्हॉट्सअॅपच्या मोबाइल व्हर्जनमध्ये असलेले फिचर्स आता हळूहळू WhatsApp Web वरही उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. व्हॉट्सअॅप वेबवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. 2 / 8WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार WhatsApp beta युझर्सना सध्या WhatsApp Web मध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्याची चाचणी सध्या सुरू आहे. 3 / 8आगामी काळात व्हॉट्सअॅपच्या सर्व वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅप वेबवरुन व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलची सुविधा देण्यात येईल. 4 / 8व्हॉट्सअॅपकडून सध्या काही मोजक्या लोकांना चाचणीसाठी हे फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. व्हॉट्सअॅप वेबवरुन व्हिडिओ कॉल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे काही स्क्रिनशॉट्स देखील व्हायरल झाले आहेत. 5 / 8'व्हॉट्सअॅप वेब'मध्ये मोबाइल व्हर्जनमधील व्हॉट्सअॅप प्रमाणेच चॅटिंगच्या शिर्षस्थानी Voice आणि Video कॉलचा पर्याय देण्यात आला आहे. व्हिडिओ कॉल येताच तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या स्क्रिनवर एक पॉपअप विंडो सुरू होते. यात कॉल उचलण्याचा आणि कट करण्याचा पर्याय असेल. 6 / 8व्हॉट्सअॅप वेबवरील व्हिडिओ कॉलमध्येही मोबाइल प्रमाणेच ऑडिओ म्यूट आणि ऑफ करण्याचा पर्याय देण्यात येईल. 7 / 8विशेष म्हणजे व्हॉट्सअॅप वेबमध्ये एखाद्याचा व्हिडिओ कॉल आल्यास तुम्हाला व्हिडिओ कॉल एका विंडोमध्ये सुरू ठेवून दुसऱ्या विंडोमध्ये चॅटिंग देखील करता येणार आहे. दरम्यान, ही नवी सुविधा सामन्यांसाठी केव्हा सुरू होईल याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. 8 / 8तुम्ही जर WhatsApp चे Beta टेस्टर आहात. तर तुम्हाला देखील व्हॉट्सअॅप वेबवर व्हि़डिओ आणि ऑडिओ कॉलिंगचा पर्याय मिळेल. अन्यथा या सुविधेची अधिकृत घोषणा होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications