warning for whatsapp scam allows criminals to access your messages know about this
WhatsApp वर पर्सनल डेटा हॅक अन् अकाऊंट होतंय लॉक; वेळीच व्हा सावध अन्यथा छोटीशी चूक पडेल महागात By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 9:41 PM1 / 13स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सध्या अनेक व्यवहार हे फोनच्या मदतीने ऑनलाईन झटपट केले जातात. मात्र याचा जसा फायदा आहे तसे तोटा देखील आहे. याचा गैरफायदा घेऊन हॅकर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. 2 / 13तंत्रज्ञानाच्या या युगात हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधून काढत आहेत. आता सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर लोकांचे अकाउंट हॅक करत आहे. त्यामुळे एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. 3 / 13काही व्हॉट्सअॅप यूजर्सने हॅकर्सने कशाप्रकारे त्यांचे अकाऊंट लॉक केले याबाबतची माहिती दिली आहे. यूजर्सने दिलेल्या माहितीनुसार, आधी त्यांना 6 अंकी एक मेसेज येतो, हॅकर्स हा मेसेज चुकीने आलेला असल्याचे सांगत तो मेसेज पुन्हा परत पाठवण्यास सांगतात. त्यानंतर हा फसवणुकीचा संपूर्ण खेळ सुरू होतो.4 / 13अकाऊंटचा अॅक्सेस मिळवण्यासाठी हे मेसेज सायबर गुन्हेगारांकडून पाठवले जातात. जेव्हा एखादी व्यक्ती आपला फोन बदलते, त्यावेळी व्हॉट्सअॅपकडून 6 अंकी कोड पाठवला जातो. यामुळे दुसऱ्या फोनमध्ये अॅक्सेस मिळतो. 5 / 13युजर्सला हा मेसेज टेक्स्टद्वारे पाठवला जातो. जर तुम्ही एखाद्याला हा मेसेज दिल्यास त्या व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस मिळतो. यानंतर यूजर्सचे व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉक होते व हॅकर्सचा वापर गुन्हेगारी गोष्टींसाठी करतात. 6 / 13सोशल मीडियावर एका यूजर्सने सांगितले की त्याच्या कुटुंबातील 3 व्यक्तींनी अशाप्रकारे अकाऊंटचा अॅक्सेस गमावला आहे. हॅकर्स व्हॉट्सअॅपवरून एक व्हेरिफाय कोड आणि मेसेज पाठवतात. 7 / 13ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने त्या कोडची खूपच आवश्यकता असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज केला जातो. अशात तुम्ही हा कोड पाठवू नये व लिंकवर देखील क्लिक करू नये. या फ्रॉडमध्ये अडकलेल्या यूजर्सने सांगितले की, सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर करतात. 8 / 13ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने त्या कोडची खूपच आवश्यकता असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज केला जातो. अशात तुम्ही हा कोड पाठवू नये व लिंकवर देखील क्लिक करू नये. या फ्रॉडमध्ये अडकलेल्या यूजर्सने सांगितले की, सायबर गुन्हेगार लोकांना टार्गेट करण्यासाठी कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर करतात. 9 / 13व्हॉट्सअॅप यूजर्सला फसवणुकीच्या या नवीन पद्धतीपासून सावध राहायला हवे. कारण, याद्वारे सायबर गुन्हेगार लोकांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करत आहेत. जर व्यक्तीला वन टाइम पिन कोड मेसेज प्राप्त होत असेल, तर सावध होणे गरजेचे आहे. याच प्रकारे व्हॉट्सअॅप फ्रॉडला सुरुवात होते. 10 / 13ओटीपी कोडचा मेसेज आल्यानंतर सायबर गुन्हेगार यूजरला एक डायरेक्ट मेसेज पाठवतात. यात मित्र अथवा ओळखीची व्यक्ती असल्याचा दावा केला जातो. यानंतर हा कोड चुकीने आला असल्याचा दावा करत परत मागितला जातो. कारण हॅकिंगसाठी या कोडची आवश्यकता असते.11 / 13हा कोड व्हॉट्सअॅप अकाऊंटचा अॅक्सेस मिळवण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड आहे. जेव्हा व्यक्ती या कोडला पाठवते, त्यावेळी अकाउंट त्वरित हॅक होते. जर तुम्हाला अशा प्रकारचा टेक्स्ट मेसेज आला, ज्यात ओटीपी कोड अथवा लिंक आहे, तर असा मेसेजला फॉरवर्ड करू नये व त्याचा स्क्रीनशॉट काढू नये. 12 / 13कोणीही कितीही ओळखीचे असले तरीही कोड कोणाला शेअर करू नये, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा फेक मेसेजपासून सावध राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 13 / 13WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. अनेक जण दिवसातील बराचसा वेळ हा व्हॉट्सअॅपवरच असतात. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications