शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 4:46 PM

1 / 6
व्हॉट्सअॅपवरील अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे जमावाकडून होणाऱ्या हिंसक आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता व्हॉट्सअॅपने एक उपाय सुचवला आहे.
2 / 6
वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन जाहिरातीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपकडून फेक न्यूजबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 'आनंद पसरवा, अफवा नाही' असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला आहे.
3 / 6
खोट्या असू शकणाऱ्या बातम्या ओळखा - व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे जाणून घ्या. ज्या मेसेजचा सोर्स माहीत नसतो असे फॉरवर्डेड मेसेज अनेकदा खोटे असतात. फोटो, व्हिडीओ, व्हॉईस रेकॉर्डींगसुद्धा एडीट करून दिशाभूल केली जाऊ शकते.
4 / 6
इतर स्त्रोतांकडून तपासून घ्या - एखाद्या मेसेजचं सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा. बातम्यांच्या विश्वसनीय साईटवरून ही बातमी कोठून आली आहे याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट तसेच इतर गोष्टींच्या सहाय्याने अधिक माहिती मिळवा.
5 / 6
अफवांचा प्रसार थांबवण्यासाठी मदत करा - तुम्हाला जर एखादी बातमी फेक वाटत असेल तर लोकांना शेअर करण्यापूर्वी ती तपासून पाहा. कोणीही शेअर करण्याची विनंती केली तरी उगाच शेअर करू नका.
6 / 6
व्हॉट्सअॅपने अफवा आणि खोट्या बातम्यांविरोधात महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरवले आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान