By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 17:01 IST
1 / 6निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. 2 / 6PROTO या भारतीय मिडीया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. 3 / 6तुम्हाला येणारे मॅसेज म्हणजेच फेक वाटणारे संदेश (+91-9643-000-888) या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावे लागतील. PROTO चे पडताळणी केंद्र तो मॅसेज तपासेल आणि तुम्हाला तो मॅसेज खरा की खोटा ते सांगेल. 4 / 6हे पडताळणी केंद्र तुम्ही पाठविलेले फोटो, व्हिडिओ लिंक्स किंवा टेक्स्ट तपासेल. सध्या या केंद्रामध्ये इंग्रजी आणि चार भारतीय भाषा पडताळल्या जातात. यामध्ये हिंदी, तेलगू, बंगाली आणि मल्याळम या भाषा आहेत. 5 / 6PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे. 6 / 6PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.