शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

iPhone 16 सीरिजमध्ये काय असणार खास?; लीक झाले फीचर्स, ४ फोन्स होणार लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 4:52 PM

1 / 8
iPhone 16 ही अॅपलची नवी सीरीज ही काही महिन्यांमध्ये लॉन्च होणार आहे. मात्र सीरीज लॉन्च होण्याआधीच या फोनमध्ये कोणते नवीनच फीचर असणार, याबाबतची माहिती समोर येऊ लागली आहे.
2 / 8
कंपनी नेहमीप्रकरणाचे या वर्षीही सप्टेंबर महिन्यात आपली नवी सीरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या फोनमध्ये अनेक नव्या गोष्टी असणार आहेत.
3 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, iPhone 16 सीरीजमधील फोन्समध्ये आपल्याला मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि नवा प्रोसेसर बघायला मिळण्याची शक्यता आहे.
4 / 8
iPhone 16च्या प्रोसेसरबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, iPhone 16 सीरीजमध्ये A18 चिप असण्याची शक्यता आहे. हा प्रोसेसर सीरीजमध्ये सर्व फोन्समध्ये कॉमन असेल. मागील काही वर्षांत अॅपलने स्टँडर्ड आणि प्रो. सीरीजमधील iPhones वेगवेगळ्या प्रोसेसरसह लॉन्च केले होते. मात्र iPhone 16 सीरीजमधील सर्व चार फोनमध्ये एकच प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
5 / 8
iPhoneच्या मागील सीरीजप्रमाणे या सीरीजमध्येही iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.
6 / 8
नव्या सीरीजमधील फोन्समध्ये प्रोसेसर एकसारखा असला तरी कॅमेरा मॉड्यूलसह अनेक बदल असणार आहेत.
7 / 8
कंपनी iPhone 16 सीरीजमध्ये पुन्हा एकदा व्हर्टिकल कॅमेरा सेटअप देण्याची शक्यता आहे. याची डिझाइन iPhone 12शी साधर्म्य साधणारी असू शकते. कॅमेऱ्यासह कंपनी नव्या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटची स्क्रीन देण्याची शक्यता आहे.
8 / 8
मिळालेल्या माहितीनुसार, स्टँडर्ड फोन्समध्ये 48MP + 12MP चा डुअल रियर कॅमेरा असेल आणि प्रो व्हेरिएंट मध्येही जुना 48MP + 12MP + 12MP चा कॅमेरा सेटअप मिळू शकतो.
टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान