शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हॉट्सअॅप चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 8:31 PM

1 / 5
व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आता अनेक महत्त्वाचा डेटा असतो. त्यामुळे व्हॉट्सअॅप चॅट आणि मीडिया फाईल्स तुमच्या फोनमधून डिलीट होवू नये. यासाठी सावधानता बाळगली पाहिजे. व्हॉट्सअॅपमधील 'चॅट बॅकअप' फिचरमुळे तुमचा डेटा सुरक्षित राहू शकतो. या फिचरमुळे युजरची चॅट हिस्ट्री, वॉईस मेसेज, फोटोज आणि व्हिडिओ गुगलच्या ड्राईव्हमध्ये सुरक्षित राहतात.
2 / 5
'चॅट बॅकअप' फिचरचा वापर तुम्ही ऑटो बॅकअप या पर्यायाने देखील करू शकता. डेली, विकली किंवा मंथली अशा तीन प्रकारांमध्ये तुम्ही डेटा सेव्ह करू शकता. तुमच्याकडे वायफाय कनेक्शन असल्यास तुम्ही डेली डेटा सेव्ह करावा. कारण बॅकअप फिचरमध्ये जास्त प्रमाणात डेटा खर्च केला जातो.
3 / 5
व्हॉट्सअॅपवर आलेला प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ डाऊनलोड केलाचं पाहिजे असे नाही. यासाठी व्हॉट्समध्ये Media auto download या पर्यायाला Disable करा. यामुळे डेटाही खर्च होणार नाही. तसेच, तुमच्या फोनमधील स्टोअरेजसुद्धा भरणार नाही.
4 / 5
तुमच्या फोनला पासवर्ड असला तरी फोन लॉक केल्यानंतरही व्हॉट्सअॅपमधील चॅटची माहिती मिळू शकते. डिफॉल्टच्या माध्यमातून नोटिफिकेशनच्या साहाय्याने फोन न लॉक करता मेसेज पाहिले जाऊ शकतात.
5 / 5
अॅण्ड्रॉईड फोनमध्ये नोटिफिकेशन डिसप्लेवर येऊ नये ही सुविधा दिली आहे. सेटिंगमध्ये साऊंड अॅण्ड नोटिफिकेशनमध्ये जा आणि हाईड सेसिटिव्ह नोटिफिकेशन पर्याय निवडा.
टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान