शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp चॅटिंगची गंमत आणखी वाढणार; 'हे' खास फीचर्स लवकरच लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 6:18 PM

1 / 7
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम असून ते सातत्याने युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅप लवकरच आणखी काही खास फीचर्स आणणार असून त्यावर सध्या बीटा व्हर्जनवर त्याची चाचणी सुरू आहे. व्हॉट्सअॅपवर तुमचं चॅटींग अधिक मजेशीर करणाऱ्या काही फीचर्सबाबत जाणून घेऊया.
2 / 7
Dark Mode फीचर - व्हॉट्सअॅप अनेक दिवसांपासून Dark Mode या खास फीचरवर काम करत आहे. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून व्हॉट्सअॅप लवकरच डार्क मोड फीचर आणणार आहे. हे फीचर ऑन केल्यावर व्हॉट्सअॅपवर बॅकग्राऊंड कलर काळा होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात.
3 / 7
Private Reply फीचर - व्हॉट्सअॅप प्रायव्हेट रिप्लाय फीचरची सुविधा ग्राहकांसाठी आणणार आहे. या फीचर्सच्या माध्यमातून ग्रुप चॅटमध्येही तुम्ही प्रायव्हेट रिप्लाय करू शकता. या फीचरच्या मदतीनं ग्रुप चॅटमध्येही कोणत्याही अडचणीविना एक युजर्स दुसऱ्या युजर्सशी चाट करू शकतो. व्हॉट्सअॅप ग्रुपवरचे मेसेज पाहण्यासाठी तीन डॉटवर क्लिक करून प्रायव्हेट रिप्लायचा पर्याय वापरू शकता.
4 / 7
Vacation Mode फीचर - सुट्टीवर किंवा फिरायला जातो तेव्हा व्हॉट्सअॅपच्या या फीचरचा वापर नक्की करू शकता. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअॅपच्या रिंगटोनपासून दूर राहू शकता सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे. तुम्ही या फीचर्सच्या माध्यमातून कन्वर्सेशन म्यूट करू शकता.
5 / 7
Silent Mode फीचर - Silent Mode फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप सायलेंटवर टाकू शकता. हे फीचर म्युट चॅटऐवजी मेसेज लपवण्यास मदत करेल. या फीचरचा वापर केल्यास तुम्हाला अनरिड मेसेजचे नोटिफिकेशन पाहता येणार नाहीत. विशेष म्हणजे हे फीचर सेटिंगमध्ये जाऊन ऑन करण्याची गरज नाही.
6 / 7
Linked Social Media अकाऊंट - व्हॉट्सअॅपच्या या फीचरच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, इन्स्टाग्रामला व्हॉट्सअॅपशी लिंक करू शकता. त्यामुळे तुम्ही केलेला मेसेजचं या सर्व प्लॅटफॉर्मवर नोटिफिकेशन पाठवता येईल. WABetaInfoच्या माहितीनुसार, या फीचरच्या माध्यमातून तुम्ही फेसबुक अकाऊंट रिकव्हर करू शकता.
7 / 7
Inline image फीचर - व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड बीटा व्हर्जन 2.18.291मध्ये inline image नोटिफिकेशन फीचरची चाचणी सुरू आहे. हे फीचर फक्त अॅन्ड्रॉइड 9.0 Pie किंवा त्याच्याहून अॅडवान्स व्हर्जनमध्ये काम करेल. WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान