शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 12:54 PM

1 / 8
WhatsApp हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप असून त्यावर काही नवीन फीचर्स लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन फीचर्स व्हिडीओ कॉलसाठी आले आहेत. यामुळे व्हिडीओ कॉल्स आता अधिक मजेदार होणार आहेत
2 / 8
लेटेस्ट अपडेटनंतर, युजर्सना नवीन फिल्टर आणि व्हिडीओ कॉल दरम्यान बॅकग्राऊंड बदलण्याचा पर्याय मिळेल. व्हिडीओ चॅटिंग दरम्यान युजर्स वेगवेगळे फिल्टर आणि बॅकग्राऊंड वापरू शकतात. WhatsApp मध्ये येणारे नवे फीचर्स कसे वापरायचे हे जाणून घेऊया...
3 / 8
WhatsApp मध्ये नवीन फिचर फिल्टरचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या व्हिडिओमध्ये Artistic Effects समाविष्ट करता येतील ज्यामध्ये युजर्सना रंग किंवा यूनिक स्टाईल पाहण्यास मिळेल. हे व्हिडीओ कॉलला अधिक चांगले व्हिज्युअल स्वरूप देईल.
4 / 8
युजर्सना १० नवीन फिल्टर्स पाहायला मिळतील. यामध्ये वॉर्म, कूल, ब्लॅक अँड व्हाईट, ड्रीमी इत्यादी विविध पर्याय दिले आहेत. प्रत्येक फिल्टर वेगळा अनुभव देतो. युजर्स त्यांच्या संभाषणाच्या मूडनुसार फिल्टर निवडू शकतात.
5 / 8
WhatsApp व्हिडीओ कॉल दरम्यान बॅकग्राऊंड सहज बदलता येतं. त्याच्या मदतीने, तुम्हाला तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये नेमकं काय दाखवायचं आहे ते तुम्ही सहजपणे निवडू शकता.
6 / 8
फीचरच्या मदतीने युजर्स त्यांच्या बॅकग्राऊंडमध्ये कॅफे किंवा बीच इत्यादी ठिकाणं दाखवू शकतात. याशिवाय यामध्ये ब्लर इफेक्टही दिसणार आहे. फिल्टर्सप्रमाणे यामध्येही १० बॅकग्राउंड ऑप्शन उपलब्ध असतील.
7 / 8
WhatsApp च्या या नव्या फीचरचा वापर करण्यासाठी, युजर्सना व्हिडीओ कॉल दरम्यान फक्त एक सोपं काम करावं लागेल. यासाठी, युजर्सना वरच्या उजव्या बाजूला असलेल्या इफेक्ट्स आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
8 / 8
यानंतर तुम्हाला उपलब्ध ऑप्शन्सवर जावं लागेल. सध्या हे फीचर रोलआउटच्या आधारावर तयार करण्यात आलं आहे आणि लवकरच हे फीचर सर्व यूजर्सपर्यंत पोहोचेल अशी माहिती मिळत आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान