शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे व्वा! गुपचूप WhatsApp ग्रुप सोडता येणार, ऑनलाईन स्टेटस लपवणंही सोपं होणार; नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 2:22 PM

1 / 9
WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. Meta चे हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत आपल्या युजर्ससाठी आकर्षक फीचर्स आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याच्या मदतीने युजर्सना अ‍ॅप वापरणे सोपे होईल. WhatsApp हे सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग झालं आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी हे लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.
2 / 9
जर काही कारणास्तव WhatsApp अवघ्या पाच दहा मिनिटांसाठी जरी डाऊन झालं तरी आपण लगेचच त्रस्त होतो. WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते आपल्या युजर्स चॅटिंग आणखी गंमतीशीर व्हावं म्हणून नवनवीन फीचर्स आणत असतं. आताही आपल्या युजर्ससाठी चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी दमदार नवीन फीचर्स आणले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया...
3 / 9
तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसह WhatsApp ग्रुपवर आहात परंतु त्यांच्या फॉरवर्ड मेसेजमुळे त्रासलेले आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला बळजबरीने कोणत्याही WhatsApp ग्रुपमध्ये राहण्याची गरज नाही. WhatsApp च्या नवीन फीचर अंतर्गत तुम्ही आता असे WhatsApp ग्रुप्स गुपचूप सोडू शकता.
4 / 9
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन काही नवीन फीचर्स सादर करणार आहे. यामध्ये तुम्ही आता तुमचं ऑनलाईन स्टेटस इंडिकेटर लपवू शकाल. याचा अर्थ आता तुम्ही ऑनलाईन आहात की नाही हे कोणालाही कळणार नाही. दुसर्‍या फीचरमध्ये तुम्ही आता ठराविक मेसेजचे स्क्रीनशॉट ब्लॉक करू शकाल. म्हणजे तुमच्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही.
5 / 9
या फीचर अंतर्गत, तेच युजर्स तुम्हाला ऑनलाईन पाहू शकतील ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा 'ऑनलाईन' स्टेटस इंडिकेटर शेअर करू इच्छिता. या फीचरची खास गोष्ट म्हणजे आता तुम्हाला फक्त तेच लोक ऑनलाईन दिसतील ज्यांना तुम्ही दाखवू इच्छिता. नवीन फीचरमध्ये, WhatsApp युजर्सना ही सुविधा प्रदान करेल ज्यासाठी त्यांना ऑनलाइन राहायचे आहे आणि कोणासाठी त्यांना ऑफलाइन स्थिती दर्शवायची आहे. या महिन्यात हे फीचर आहे.
6 / 9
WhatsApp युजर्सना आता लवकरच WhatsApp व्यू वन्स मेसेजचा स्क्रिनशॉट घेता येणार नाही. WhatsApp व्यू वन्स हे असे फीचर आहे. ज्यामध्ये युजर एकदाच मेसेज पाहू शकतात. त्यानंतर तो मेसेज गायब होतो. सध्या मेसेजचा स्क्रिनश़ॉट घेता येतो. पण नवीन फीचर आल्यानंतर मात्र मेसेजचा स्क्रिनशॉट हा घेता येणार नाही.
7 / 9
WhatsApp View वन्स फीचर अंतर्गत मेसेज पाठवताना स्क्रीनशॉट ब्लॉक करणं निवडू शकता. यामुळे आता युजर्सना WhatsApp व्यू वन्स’ या फीचर अंतर्गत मेसेज पाठवताना स्क्रीनशॉट घेण्याची भीती राहणार नाही. या फीचरची सध्या चाचणी सुरू असून लवकरच ते युजर्ससाठी सादर केले जाऊ शकते.
8 / 9
WhatsApp लवकरच आपल्या युजर्सना कोणत्याही ग्रुपमधून शांतपणे बाहेर पडण्याची परवानगी देईल. याचा अर्थ असा की समजा तुम्हाला WhatsApp ग्रुप सोडायचा आहे पण ग्रुपच्या इतर सदस्यांना त्याची माहिती मिळू नये असे वाटते. अशा परिस्थितीत, तुम्ही शांतपणे WhatsApp सोडू शकता.
9 / 9
तुम्ही WhatsApp ग्रुप सोडल्याची माहिती ग्रुप एडमिनला जाईल. म्हणजेच इतर सदस्यांना नाही तर फक्त एडमिनलाच याची माहिती मिळेल. WhatsApp म्हटले आहे की हे फीचर या महिन्यापासून सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यात येईल. WhatsApp चे नवीन फीचर्स युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान