WhatsApp calling getting new feature ar effects in video call update whatsapp app face filter modes
WhatsApp युजर्सची धमाल, Video कॉलवर फिल्टर लावता येणार, बॅकग्राऊंड बदलण्याचीही संधी By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:03 PM1 / 9WhatsApp वर नवनवीन फीचर्स कायम येत असतात. त्यामुळे युजर्सला आणखी चांगला एक्सपीरिएन्स मिळतो. आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वाढता ट्रेंड पाहता आता कंपनी कॉलसाठी नवीन AR फीचर आणत आहे. 2 / 9WABetaInfo ने आपल्या पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, WhatsApp कॉल इफेक्ट आणि फिल्टरसाठी एक नवीन AR फीचर आणत आहे. यासह, कॉलिंग पूर्वीपेक्षा अधिक चांगलं आणि मजेदार होईल. कंपनीने हे फीचर अँड्रॉइड बीटा 2.24.16.7 अपडेट आणि iOS बीटा अपडेट 24,17.10.74 मध्ये सादर केलं आहे.3 / 9हे नीट समजून घेण्यासाठी WB ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. नवीन टूल कॉलिंग दरम्यान व्हिडीओ कॉलिंग अनुभवामध्ये कसा मोठा बदल घडवून आणेल हे पाहता येईल. यामध्ये युजर्सना वेगवेगळे फेस फिल्टरही मिळतील. 4 / 9युजर्स कॉलिंग दरम्यान त्यांच्या आवडीनुसार फिल्टर बदलू शकतील. मुलींना अॅपमधील फिल्टर्स खूप आवडतात, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही, त्यामुळे हे फीचर त्यांना खूप आनंदित करतील.5 / 9WhatsApp ने बॅकग्राऊंड एडिटिंग टूल देखील सादर केलं आहे जे व्हिडीओ कॉल पर्सनलाईज करण्याचे आणखी मार्ग प्रदान करते. हे टूल युजर्सना त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी अस्पष्ट करण्याची किंवा WhatsApp बॅकग्राऊंड बदलण्याची संधी देतं.6 / 9आणखी एक खास फीचर जे युजर्ससाठी खूप उपयुक्त असेल ते म्हणजे युजर्सना या फीचर अंतर्गत लो-लाइट मोड बटण देखील मिळेल. या फीचरच्या नावावरूनच हे फीचर कमी प्रकाशासाठी असल्याचं सूचित होतं. 7 / 9जर तुमच्या कॉल दरम्यान आजूबाजूला लाईट नसेल तर या फीचरच्या मदतीने लाईट वाढवता येईल. याशिवाय यात टच-अप मोडही दिला जात आहे. याचा युजरला मोठा फायदा होऊ शकतो. 8 / 9AR फीचरची आणखी एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही कॉल करताना जी काही सेटिंग कराल, पुढच्या वेळी कॉल कराल तेव्हा तुम्हाला तीच सेटिंग पुन्हा करावी लागणार नाही आणि ते आपोआप मागील वेळेप्रमाणे सेट होईल.9 / 9या फीचरमध्ये उपलब्ध सर्व मोड्स पाहता असं दिसतं की कॉल करणं आता पूर्वीपेक्षा अधिक इंटरएक्टिव्ह, सोपे आणि मजेशीर होणार आहे. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications